16 जुलै म्हणजेच आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण आज एका अशा परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे जी परीक्षा कधी झालीच नाही. कोरोनामुळे दहावीची परीक्षा होऊ शकली नाही मात्र राज्याचा शिक्षण मंडळाकडून (SSC Result Website) विशेष मूल्यांकन पद्धतीनं निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण ही मूल्यांकन पद्धत (Special Assessment system) नक्की असेल तरी कशी? याबद्दल जाणून घेऊया.