

यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ट्रेड अप्रेंटिसच्या 188 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा अर्ज भरुन वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.


तर मंडळी वाट कसली पाहताय...घाई करा कारण, या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर असणार आहे.


पात्रता : ट्रेड अप्रेंटिस करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेवारांचं वय 18 ते 25 वर्ष इतकं असणं गरजेचं आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेवारांना वयाच्या अटीतून सूट देण्यात आली आहे.


या पदासाठी अर्ज करणारे ओबीसी आणि सामान्य प्रवर्गातील उमेदवार 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असणं गरजेचं आहे. तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेवार किमान 45 टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा पास झालेला असावा.


इच्छुक उमेदवारांना अजून एक शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या या उमेदवारांनी नॅशनल काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंगमधून 60 टक्के गुणांसह आयटीआयचं शिक्षण घेतलेलं असावं.


निवड प्रक्रिया : या पदांसाठीची निवड प्रक्रिया उमेदवाराला दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.