

पेट्रोल भरणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पण पेट्रोल पंप चालवण्याचा व्यवसाय मोठ्या फायद्याचा आहे. मोक्याच्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू केला तर चांगली कमाई करू शकतात. सरकारी इंधन कंपनी इंडियन आॅयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने देशभरात पेट्रोल पंप डिलरशीप देत आहे.


इंडियन आॅयलने देशभरात 27,000 नवीन पेट्रोल पंप देण्यासाठी निवेदनं मागवली आहे. जर तुमच्याकडे जास्त पैसे नाही आणि तुमच्या नावावर जागा नाही तरीही तुम्ही पेट्रोल पंप डिलरशिपसाठी अर्ज करू शकतात.


अशी आहे आॅनलाईऩ प्रक्रिया - पेट्रोल पंप डिलरशीप घेण्यासाठी तुम्हाला www.petrolpumpdealerchayan.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.


या वेबसाईटवर सर्व नियम आणि अटी शर्थी देण्यात आल्या आहे. पेट्रोल पंप उघडण्यासाठीचा अर्ज हा आॅनलाईन देण्यात आला आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सांगणारा डेमोही इथं उपलब्ध आहे.


आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासोबतच ज्या त्या राज्यातील स्थानिक कार्यालयाचा संपर्क दिला आहे. तुम्ही त्या कार्यालयात फोन करून अधिक माहिती घेऊ शकतात. डिलरशीपसाठी आॅनलाईन अर्ज 24 डिसेंबर 2018 पर्यंत भरू शकतात.


कोण कोण भरू शकतो अर्ज - पेट्रोल पंपचालक होण्यासाठी भारतीय नागरिकत्व असणे गरजेचं आहे. सोबतच तुमचे वय हे 21 ते 60 वर्ष दरम्यान असले पाहिजे आणि कमीत कमी तुमचे शिक्षण हे 10 पर्यंत झाले पाहिजे.


नियम झाले सोपे - पेट्रोल पंप उघडण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले आहे. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रं सादर करायची आहे त्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे. तुमच्या बँक खात्यात 25 लाख ठेवी असण्याची आवश्यकता नाही. तसंच जर तुमच्याकडे जमीन नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. परंतु, जेव्हा तुम्हाला जमीन दाखवण्यासाठी सांगितलं जाईल तेव्हा तुमच्याकडे जमीन खरेदी व्यवहाराची प्रत दाखवावी लागणार आहे.