उर्मिलानं दिला मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, पतीसोबत केलं रक्तदान
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी आज (रविवार) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं.


बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनी रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कूपर हॉस्पिटलमध्ये उर्मिला आणि तिचे पती मोसीन (Mosin)यांनी रक्तदान केलं.


राज्यात कोरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन केलं आहे.


राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्यामुळे रुग्ण त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविद्यालयातील युवावर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे.