

संयुक्त अरब अमिरातील तसं पाहता कायद्यांमध्ये लवचिकता आहे. मात्र काही कायदे मात्र अत्यंत कडक असल्याचं पाहायला मिळत. येथे अनेकदा तुम्हाला थट्टा करणं भारी पडू शकतं आणि इतकच नाही तर तुम्हाला यासाठी तुरुंगातही जावं लागू शकतं. असंही काहीसं एका ब्रिटीश महिलेसोबत घडलं आहे.


या ब्रिटीश महिलेला देशातून जात असताना एअरपोर्टवर अटक करण्यात आली. कारण तिच्यासोबत त्याच फ्लाइटमध्ये असलेल्या एका युक्रेनी तरुणीने तिची तक्रार केली होती. ब्रिटीश महिलेने युक्रेनी तरुणीविरोधात अपशब्दाचा वापर केला अशी तिची तक्रार होती. ब्रिटीश महिलेने 'F*** YOU' या शब्दाचा वापर केला होता. आणि या एका शब्दामुळे तिला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याहून अधिक हैराण करणारी बाब तर पुढे आहे.


ब्रिटीश महिला ब्रायटोनची असून तिचं वय 31 आहे आणि ती ग्लूकेस्टरशायर (इंग्लँड) बेस्ड कंपनीत एचआर मॅनेजर आहे. तिच्यासोबत फ्लाइटमध्ये एक युक्रेन तरुणी होती. जी ब्रिटीश महिलेनुसार चंचल आणि चांगली मुलगी आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात तिने आपल्या युक्रेनी फ्लॅटमेटला रागाच्या भरात व्हॉट्सअॅपवर 'F*** You' लिहिलं होतं. कारण लॉकडाउन दरम्यान तिच्या रुममेटने डायनिंग टेबलवर ऑफिसच काम केलं होतं. मात्र तिला माहित नव्हतं की, दोन मिनिटांचा राग तिला किती भारी पडू शकतो.


ब्रायटोनने सांगितलं की, तिने आपल्या फ्लॅटमेटला ऑक्टोबर महिन्यात तो मॅसेज केला होता आणि आता ती दुबई सोडून कायमची आपल्या कुटुंबाकडे ब्रिटेनमध्ये जात होती. ब्राइटोनने सांगितलं की, तिने आपल्या फ्लॅटमेटला ऑक्टोबर महिन्यात तो मेसेज पाठवला होता. तिचा व्हिसाही संपत आला होता. तिने फ्लाइटचं तिकीट घेतलं आणि ती एअरपोर्टला पोहोचली तोच...


एअरपोर्टवर जेव्हा ती आत येत होती, तिला तेथेच थांबवण्यात आलं. तिला सांगण्यात आलं की, तिच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर ब्रिटीश महिलेने आपल्या युक्रेनी महिलेची माफी मागितली आणि केस मागे घेण्यास सांगितलं. मात्र तिच्या रुममेटने केस मागे घेण्यास नकार दिला. ज्यानंतर आता दोन वर्षांसाठी तिला तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. ही महिला 2018 मध्ये दुबईला राहत होती, तेव्हा तिला कधीच त्रासाला सामोरे जावं लागलं नाही