

मात्र, महिलांप्रती गुगल अजिबात सहिष्णु नसल्याचं स्पष्ट झालंय. 'Bitches Near Me' असं सर्च करताच मुलींच्या शाळा, पीजी आणि मुलींच्या वसतीगृहांची लिस्ट उघडत आहेत. Bitches याचा मराठी अर्थ व्यभिचारिणी असा होतो. 'न्यूज बाइट' या संकेतस्थळाने यासंदर्भात केलेल्या रिपोर्ट नंतर ही धक्कादायक बाब समोर आली. आम्हीसुद्धा त्या रिपोर्टची शाहनिशा केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.


'Bitches Near Me' असं सर्च करताच समोर आलेल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर एका गर्ल्स वियर स्टोरचं नाव आलं. त्यानंतर लागोपाठ पुढचे 6 परिणाम हे गर्ल्स पीजी आणि हॉस्टलचे होते. लिस्टमध्ये पुढे अनेक ठिकाणी मुलींच्या शाळा, कॉलेज आणि वसतीगृहांसर्दर्भात माहिती होती.


ही धक्कादायक बाब समोर येताच अनेकांनी ट्विटरवर गुगलप्रती नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तर गुगलच्या शोध प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, तर अनेकांनी गुगलसाठी काम करणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेला दोष दिला आहे. एस्थेटिक पोटॅटो नावाच्या व्यक्तीने तर 'असं का होत आहे?' असा थेट प्रश्न गुगलला ट्विट करून विचारला आहे. त्यात त्याने गुगलला टॅग केलंय.


तर, कार्तिक शंकर नावाच्या व्यक्तीने ट्विट केलंय की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस चा अभ्यास करणाऱ्यांना आधी एथिक्स, सोशियोलॉजी आणि जेंडर स्टडीज शिकवा, असं म्हटलंय. विशेष बाब अशी की, यासंदर्भात ट्विटरवर गुगलला टॅग केलेलं असतानासुद्धा गुगलने अद्याप कोणतंच पाऊल उचलेलं नाही. सर्च रिझल्टमध्ये पूर्वीप्रमाणेच मुलींच्या शाळा, वसतीगृहे आणि पीजी ची लिस्ट उघडत आहे.