BIGG BOSS 14 च्या अलिशान घराची सफर, कसं आहे घर एकदा पाहाच !
प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवणारा बिग बॉस 14 (Big Boss 14) शो 3 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चौदाव्या सिझनमध्ये घरातही नवनवे बदल करण्यात आले आहेत. शो सुरू होण्याआधीच आम्ही तुम्हाला घडवणार आहोत बिग बॉसच्या घराची सफर.

डिझायनर उमंग कुमारने बिग बॉस 14 (Big Boss 14)च्या घरातील पडद्यापासून ते महागड्या फर्निचरपर्यंत सारं काही अतिशय उत्तमरित्या सुशोभित केलं आहे. उत्तम रंगसंगती आणि अद्ययावत तंत्राचा वापर करुन घराची सजावट करण्यात आली आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये थिएटरपासून स्पापर्यंत डायनिंग एरियापासून शॉपिंग मॉलपर्यंत सगळ्या सुखसोयी तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून घराच्या डेकॉरेशनवर मेहनत घेतली जात आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता घर सजवण्यात आलं आहे.

लिविंग एरियामध्ये जिथे स्पर्धक बसतील त्या भागाला पूर्णपणे मेटलचं फिनिशिंग देण्यात आलं आहे. ज्यामुळे घराला रिच लूक येतो. लिविंग एरियाच्या जमिनीलासुद्धा डोळ्याचा आकार देण्यात आला आहे.

बिग बॉसच्या सिझन 14 ची बेडरुम खूपच रंगीबेरंगी आहे. बेडच्या वरती मेटलचा डोळा बसवण्यात आला आहे, जो सर्व स्पर्धकांवर नजर ठेवेल. बेडरुमच्या मधोमध एक कलरफूल सोफा ठेवण्यात आला आहे. जिथे स्पर्धक निवांतपणेगप्पा मारायला बसू शकतात.