

ऑक्टोबरच्या सुरुवातीसह आता फेस्टिव्ह सीजनही जवळ आला आहे. कोरोना व्हायरसचा ऑटोमोबाईल सेक्टरवर मोठा परिणाम झाला आहे. पण आता हळू-हळू ऑटो सेक्टर उभारी घेत असल्याचं चित्र आहे. कार कंपन्यांना आता फेस्टिव्ह सीजनकडून मोठी आशा असून त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. Maruti Suzukiने त्यांच्या अनेक मॉडेल्सवर डिस्काऊंट जाहीर केला आहे.


Maruti Alto 800: Maruti Suzuki Alto 800 एन्ट्री लेवल मॉडेल असून कंपनीने BS6 मध्ये बाजारात आणली आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन वेरिएंटमध्ये आहे. मारुती या कारवर 41000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. यात 21000 रुपये कॅश डिस्काऊंट आणि 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. त्याशिवाय कॉर्पोरेट बोनस म्हणून 5000 रुपयांची सूट मिळणार आहे.


Maruti Celerio: सेलेरियो हॅचबॅक छोट्या कारमधील सर्वात पॉप्युलर कार आहे. कंपनीने ही कारही BS6 इंजिनमध्ये लॉन्च केली आहे. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन प्रकारात असलेल्या या कारला मॅन्युअल आणि AMT गियरबॉक्सचा पर्याय आहे. सेलेरियोवर 28000 रुपयांची सूट देण्यात येत आहे.


Maruti Eeco: मारुती सुझुकीने Omni van बंद केल्यानंतर त्याची जागा आता Eecoने घेतली. BS6 इंजिनवाल्या या कारमध्ये पॅसेंजर आणि कार्गो व्हर्जन म्हणून डिझाइन केली गेली आहे. यातही पेट्रोल आणि सीएनजीचा पर्याय आहे. या कारवर 38000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतो आहे. यात 13000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 20000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटही मिळतो आहे.


Maruti S-Presso: मारुतीची ही मायक्रो एसयूव्ही बाजारात टाटा टियागो आणि रेनॉ क्विडला टक्कर देते. कंपनी ही कारदेखील पेट्रोल आणि सीएनजीमध्ये बाजारात आणली आहे. यात मॅन्युअल आणि AMT गियरबॉक्सचा पर्याय मिळणार आहे. या कारवर 23000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 20000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळणार आहे.


Maruti WagonR: Maruti WagonRला 1.0 लीटर आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजनसह मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स पर्यायासह उपलब्ध आहे. Maruti WagonR पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्यायात आहे. कंपनी यावर 15000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 20000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट देत आहे. त्याशिवाय 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटही मिळणार आहे.


Maruti Swift: Maruti Swift मिड-साईज हॅचबॅकमध्ये सर्वात पॉप्युलर कारपैकी एक आहे. कंपनी ही कार पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध करत आहे. Maruti Swift वर 15000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 20000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देत आहे.


Maruti Dzire: BS6 इंजनसह ही कार उपलब्ध असून कंपनीने याचं डिझेल मॉडेल बंद केलं आहे. यावर 14000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 25000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, त्याशिवाय 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळतो आहे.