एकापेक्षा एक! जुलैमध्ये लाँच होणार या 5 दमदार कार, जाणून घ्या फिचर्स
लॉकडाउनच्या काळात ठप्प झालेली ऑटो इंडस्ट्री आता हळूहळू पुर्वपदावर येत आहे. लॉकडाउनच्या काळात ज्या कारचे लॉंचिंग अडकले होते ते जून महिन्यात उरकण्यात आले आहे. आता जुलै महिन्यात Honda, Mercedes सह अनेक ब्रँड भारतात नवी गाड्या लाँच करणार आहे.


Audi RS7 Sportback - जर्मन कंपनी ऑडी (Audi) ने आपली नवी ‘आरएस-7 स्पोर्टबॅक’ (Audi RS7 Sportback) ची डिलेव्हरी ऑगस्टपासून सुरू करणार आहे. RS7 स्पोर्टबॅकही दुसऱ्या जनरेशनमधील कार आहे. ही कार बुक करण्यासाठी तुम्हाला आधी 10 लाख रुपये मोजावे लागणार आहे. ऑडी आरएस 7 स्पोर्टबॅकमध्ये 4.0 लीटर V8 इंजिन दिले आहे. जे 600PS आणि 800 Nm टॉर्क जनरेट करते. ऑडी आरएस 7 स्पोर्टबॅक 250 किमी प्रति तास धावू शकते. फक्त 3.6 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग पकडते.


New Honda City: भारतात प्रीमियम कार निर्माता कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) ने आपल्या बहुप्रतिक्षित ऑल न्यू 5th जनरेशन होंडा सिटी (Honda City) चे उत्पादन सुरू केले आहे. 5th जनरेशन मॉडेलमध्ये VTC प्रणालीसह ऑल-न्यू 1.5 लिटर i-VTEC DOHC इंजिन दिले आहे. त्याचबरोबर डिझेलमध्ये रिफांडइ 1.5 लिटर i-DTEC इंजन दिले आहे. हे दोन्ही इंजिन BS-6 उत्सर्जन मानकांसह आहे.


Mercedes-Benz EQC: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंजने लॉकडाउनच्या दरम्यान दोन गाड्यांचे ऑनलाइन लाँच केले होते. आता कंपनी जुलै 2020 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक SUV - EQC लाँच करणार आहे मर्सिडीज -Benz EQC ही एक लक्झरी SUV आहे. यात एलएडी हेडलॅप्स, मोठे अलॉय व्हील आणि एलईडी टेललॅप्स दिले आहे.


Nissan Ariya: जपानची कार उत्पादक कंपनी असलेल्या निसान (Nissan) नेही आपली नवीन इलेक्ट्रिक SUV, Nissan Ariya चा टिझर रिलीज केला आहे. ही कार जुलै महिन्यात लाँच होणार आहे. Ariya निसान ही पहिली झिरो इमिशन एसयुव्ही आहे. असं म्हटलं जात आहे की, Ariya ही एका कॉन्सेप्ट कारवर तयार करण्यात आली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर 480 किमी प्रति तास या वेगाने धावू शकते. Ariya मध्ये ऑल-व्हील ड्राइव (AWD) सिस्टम दिले आहे.


MG Hector Plus: ब्रिटेनची कार निर्माता कंपनी मॉरिस गॅरेज (MG Motor India) ने एसयुव्ही हेक्टरसह भारतीय बाजारपेठेत एंट्री केली होती, आता कंपनी हेक्टर प्लस हे नवीन मॉडेल घेऊन आले आहे. आधीची हेक्टरही 5 सीटर होती. तर आता नवीन हेक्टर प्लसही 6 आणि 7 सीटर व्हर्जनसह असणार आहे. या कारमध्ये BS6 मानकांसह 1.5-litre turbo petrol, 48V mild-hybrid system सह 1.5-litre petrol किंवा 2.0-litre diesel engine मिळणार आहे.