Triumph ची सुपरबाइक Street triple R पुढील आठवड्यात लाँच, जाणून फिचर्स आणि किंमत...
Triumph Street triple R ही बाइक आधीचे मॉडेल स्ट्रीट ट्रिपल RS च्या तुलनेत स्वस्त आहे. Triumph या बाइकचे बुकिंग सुद्धा सुरू केले आहे.
|
1/ 8
triumph ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने काही महिन्यांपूर्वी भारतात नवीन बाईक लाँच करणार अशी घोषणा केली होती. अखेर या कंपनीने यावरून पडदा हटवला असून येत्या 11 तारखेला 2020 ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आर (Triumph Street triple R) ही बाइक लाँच होणार आहे.
2/ 8
Triumph Street triple R ही बाइक आधीचे मॉ़डेल स्ट्रीट ट्रिपल RS च्या तुलनेत स्वस्त आहे. Triumph या बाइकचे बुकिंग सुद्धा सुरू केले आहे. 1 लाखाची रक्कम देऊन तुम्हीही शानदार बाईक बूक करू शकता.
3/ 8
Triumph Street triple R मध्ये 765 सीसी, इन-लाइन तीन-सिलेंडर इंजिन दिले आहे. हेच इंजिन आधीच्या स्ट्रीट ट्रिपल RS मध्ये लावण्यात आले आहे. फक्त यात ताकद थोडी कमी करण्यात आली आहे.
4/ 8
Triumph Street triple R मॉडेलमध्ये असलेल्या इंजिनमधून 12,000 RPM वर 116 BHP इतकी पॉवर आणि 9,400 RPM वर 77 NM टॉर्क जनरेट होईल.
5/ 8
तर Triumph Street RS चे इंजिन तब्बल 121 BHP पॉवर आणि 79 NM इतका टॉर्क जनरेट करतो. Triumph Street RS च्या तुलनेत नव्या मॉडेलमध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहे.
6/ 8
Triumph Street triple R मध्ये टीएफटी इंस्ट्रुमेंट कन्सोलच्या जागी डिजिटल पार्ट एनेलॉग कन्सोल दिले आहे. त्याचबरोबर रंग आणि डिझाइनमध्येही बदल केले आहे.
7/ 8
या बाइकमध्ये ब्रेम्बो एम4.32 फोर-पिस्टन मोनोब्लॉक क्लिपर्ससह 310 एमएम डिस्क ब्रेक दिले आहे. पहिल्या मॉडेलच्या तुलनेत Triumph Street triple R चे वजन दोन किलोने जास्त आहे. पण, लूकमध्ये दोन्ही गाड्या या जवळपास सारख्याच आहे.
8/ 8
Triumph Street triple RS ची दिल्ली एक्स शोरुम किंमत 11.33 लाख आहे. तर Triumph Street triple R ची किंमतही 10.5 लाख असण्याची शक्यता आहे.