या आहे 3 लाखांमध्ये स्वस्तात मस्त कार, ज्या करतील तुमचे स्वप्न पूर्ण, पाहा PHOTOS
कार घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. पण, इंधनाचे वाढते दर आणि कारच्या किंमतींमुळे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते. पण, जर तुमचे बजेट हे 3 लाखांच्या आसपास असेल तर तुम्हाला या गाड्या नक्कीच फायदेशीर ठरतील आणि तुमचे स्वप्नही पूर्ण होईल.
|
1/ 11
कार घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. पण, इंधनाचे वाढते दर आणि कारच्या किंमतींमुळे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते. पण, जर तुमचे बजेट हे 3 लाखांच्या आसपास असेल तर तुम्हाला या गाड्या नक्कीच फायदेशीर ठरतील आणि तुमचे स्वप्नही पूर्ण होईल.
2/ 11
Datsun (डाटसन) भारतात अलीकडे Datsun ने आपली सर्वात स्वस्त Datsun redi-GO facelift लाँच केली आहे. ही कार थेट Maruti Suzuki Alto आणि Renault Kwid सारख्या गाड्यांना टक्कर देते.
3/ 11
redi-GO चे च्या जुन्या कारमध्ये 0.8-लिटर आणि 1.0-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. नवीन कार ही BS6 मानंकासह आहे. यात 0.8-लिटर इंजिन 5,600 rpm वर 54 bhp इतकी पॉवर देते.
4/ 11
यात 0.8-लिटर इंजिन 5,600 rpm वर 54 bhp इतकी पॉवर देते. तर 1.0-लिटर इंजिन 5,550 rpm वर 67 bhp इतकी पॉवर देत 4,250 rpm वर 91 Nm टॉर्क जेनरेट करते.
5/ 11
या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स तर1.0-लिटर इंजिनमध्ये 5-स्पीड AMT दिले आहे.
6/ 11
Renault Kwid- फ्रान्सची प्रमुख वाहन निर्माता कंपनी असलेल्या Renault ची लोकप्रिय हॅचबॅक कार Kwid वर सध्या अनेक ऑफर आहे. या कारची किंमत 2.92 लाखांपासून ते 5.01 लाखांपर्यंत आहे. यामध्ये Standard, RxE, RxL, RxT (O) आणि Climber चा समावेश आहे.
7/ 11
नव्या क्विडच्या रिअरलूकमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. यात नवीन रिअर बंपर, नवीन लाइट रिफ्लेक्टर्स आहेत. तसेच क्लाइम्बरमध्ये फ्रंट आणि बॅक फॉक्स स्किड प्लेट्स, रूफ रेल्स मिळतील.
8/ 11
गाडीच्या इंटेरिअरमध्येही थोडासा बदल करण्यात आला आहे. नवीन 8 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन स्टिअरिंग व्हील आहे. याशिवाय सीट फॅब्रिक आणि डोअर पॅडमध्ये किंचित बदल कऱण्यात आले आहेत. गाडीच्या बेसिक मॉडेलची किंमत 2.83 लाख रुपयांपासून आहे.
9/ 11
जुन्या क्वीडसारखंच या गाडीला 0.8 लीटर आणि 1.0 लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. 0.8 लीटर इंजिनची क्षमता 54hp आणि 1.0 लीटर इंजिनची क्षमता 68hp इतकी आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. दोन्ही इंजिन बीएस4 एमिशन नॉर्म्सप्रमाणे आहेत.
10/ 11
Maruti Suzuki Alto - सर्वसामान्यांचं कारचं स्वप्न मारूती सुझुकीच्या Alto ने पूर्ण केलं. म्हणून ग्राहक नेहमीच Altoला पसंती देत असतात. आता मारुती सुझकीनं Alto BS6 वेरिएंट लाँच केले आहे.
11/ 11
Maruti Alto मध्ये 796 cc इंजिन आहे. CNG मोडमध्ये हे इंजिन 40.36 bhp पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करतो. तर, पेट्रोलवर चालताना हे इंजिन 47.33 bhp पॉवर आणि 69 Nm टॉर्क जनरेट करतो. Maruti Suzuki Alto ची एक्स शोरूम किंमत 2,94,800 रुपयांपासून सुरू होते.