TATA Punch: टाटाची नवी कार लाँच; देशातली सर्वात स्वस्त SUV ठरणार का? पाहा फीचर्स, किंमत
टाटा मोटर्सने नवी SUV लाँच केली आहे. Tata Punch ही कॉम्पॅक्ट SUV कॅटेगरीमध्ये सर्वात परवडणारी गाडी ठरू शकते. 21,000 रुपयांत गाडी बुक करता येईल पाहा कशी...
तुम्हाला तुमच्या मोठ्या कुटुंबाच्या हिशोबानं आणि आपल्या बजेटमध्ये चांगली आणि स्टायलिश कार घ्यावी असं वाटत असेल तर Tata ने नवा पर्याय सादर केला आहे. TATA PUNCH नावाची एक धमाकेदार SUV कार लाँच झाली आहे. या गाडीची फीचर्स, लुक, किंमत काय आहे जाणून घ्या
2/ 6
Tata Motors ने आपली नवीन micro suv TATA PUNCH लॉन्च केली आहे. गाडीचं बुकिंग देखील आजपासून सुरू झालं आहे. फक्त 21000 रुपये देऊन गाडी बुक करू शकाल.
3/ 6
दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या मुहूर्तावर ही कार बाजारात आणण्याची कंपनीची तयारी आहे. किंमतींबाबत टाटा कंपनीनं अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. पण ही गाडी SUV गाड्यांच्या गटात सर्वात स्वस्त गाडी ठरू शकेल, असा अंदाज ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
4/ 6
TATA PUNCH या कारला अल्फा प्लॅटफॉर्मवर प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझच्या धर्तीवर विकसित केलं गेलं आहे. यात 16-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील्स असतील. त्याचबरोबर एक शक्तिशाली इंजिन आणि अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स मिळतील.
5/ 6
भारतीय बाजारपेठेत TATA PUNCH ही कार मारुती सुझुकी इग्निस, रेनॉ किगर, निसान मॅग्नाइट, ह्युंदाईच्या आगामी कॅस्पर तसंच सिट्रोएन सी 3 शी स्पर्धा करेल अशी अपेक्षा आहे.
6/ 6
TATA PUNCH चे इंटीरियर्स खास बनवण्यात आले आहेत. त जी इन्फोटेनमेंट स्क्रीन दिली आहे. ती tata nexon च्या इन्फोटेनमेंट सिस्टिमसारखी दिसते.