

दक्षिण भारतातील लोकप्रिय सुपरस्टार आणि मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते ममुटी आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. केरळमधील अलप्पुझा या छोट्याशा गावात शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या ममुटी यांनी संघर्ष करून करिअर बनवले आहे. आज ममुटी हे लोकप्रिय अभिनेते आहे. त्यांना धोनीप्रमाणे प्रचंड गाड्यांचा छंद आहे.


ममुटी यांच्याकडे एकापेक्षा एक शानदार आणि आलिशान गाड्या आहे. त्यांच्याकडे एकूण गाड्यांची संख्या ऐकली तर कुणालाही भोवळं येईल. ममुटी हे दररोज एक नवीन गाडी चालवतात, इतके मोठे गाड्यांचे त्यांच्याकडे कलेक्शन आहे. ममुटी यांच्या गॅरेजमध्ये तब्बल 369 गाड्या आहे.


मल्याळम आणि तमिळमध्ये ममुटी यांनी अनेक सुपरहिट सिनेमे केले आहे. त्यांचं खरं नाव हे मोहम्मद कुट्टी इस्माइल पानीपराम्बिल आहे. पण सिनेसृष्टीत त्यांनी आपले नाव ममुटी ठेवणे पसंत केले. गाड्यांच्या प्रेमापोटी ममुटी यांनी स्वतंत्र्य असे भव्य गॅरेज उभारले आहे.


साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये Audi (ऑडी) कार खरेदी करणारे ममुटी हे पहिले स्टार ठरले आहे. त्यांच्या अनेक देशी आणि परदेशातील गाड्या आहे. ममुटी यांची मारुती ही पहिली गाडी होती. अजूनही त्यांच्या मारुतीच्या 3 गाड्या आहे.


ममुटीच्या कलेक्शनमध्ये Ferrari (फरारी), Mercedes (मर्सिडिज) आणि Audi (ऑडी), Porsche (पोर्शे), Mini Cooper S, F10 BMW 530d आणि 525d, E46 BMW M3, Volkswagen Passat (फॉक्सवॅगन पॅसेट) X2, Mitsubishi Pajero Sport, Toyota फॉर्च्युनर, Toyota लँड क्रूझर LC 200 आणि अनेक एसयुव्ही आहे. ममुटी यांच्याकडे Eicher (आइशर) ची कस्टमाइज्ड कॅरावॅन सुद्धा आहे.


त्याच्याकडे Mini Cooper S, F10 BMW 530d आणि 525d, E46 BMW M3, Volkswagen Passat (फॉक्सवॅगन पॅसेट) X2 या गाड्या सुद्धा आहे.


ममुटी यांच्या कार कलेक्शनमध्ये अलीकडे Jaguar XJ-L Caviar दाखल झाली आहे. त्यांना ही कार इतकी आवडली की त्यांनी पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही मॉडेल खरेदी केले.