3.04 लाखांची दमदार KTM 390 Adventure घरी घेऊन जा फक्त 6,999 EMI वर,अशी आहे ऑफर
लॉकडाउनच्या काळात बाइकच्या विक्रीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे ही ऑफर देण्यात येत आहे.
|
1/ 8
अडव्हेंचर आणि लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी KTM 390 Adventure ही शानदार बाइक लाँच झालेली आहे. परंतु, या बाइकची किंमत जास्त असल्यामुळे लोकांचा जास्त प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता ही कंपनीने एक खास ऑफर आणली आहे.
2/ 8
KTM 390 Adventure ची एक्स शोरुम किंमतही तब्बल 3.04 लाख इतकी आहे. त्यामुळे या बाइकला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही शानदार बाइक खरेदी करण्यासाठी कंपनीने नामी संधी दिली आहे.
3/ 8
बजाज ऑटो (Bajaj Auto) ने या शानदार अॅडव्हेंचर बाइकवर नवीन ऑफर आणली आहे. ग्राहकांना KTM 390 Adventure फख्त 6,999 रुपये EMI देऊन खरेदी करता येणार आहे.
4/ 8
या ऑफरमध्ये कंपनीने 5 वर्षांसाठी ऑन रोड किंमतीवर 80 टक्के लोन उपलब्ध केले आहे. लॉकडाउनच्या काळात बाइकच्या विक्रीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे ही ऑफर लाँच केली आहे.
5/ 8
KTM 390 Adventure मध्ये पॉवरफुल 373CC सिंगल सिलेंडर BS6 इंजिन दिले आहे.
6/ 8
9000 RPM वर 42.91 Hp इतकी पॉवर आणि 7000 आरपीएमवर 37 Nm टॉर्क जेनरेट करते.
7/ 8
KTM 390 Adventure मध्ये 6-स्पीड गियरबॉक्स दिला आहे. तसंच या बाइकमध्ये समोर 320 मिलीमीटर डिस्क ब्रेक दिले आहे. तर मागे 230 मिलीमीटर का डिस्क ब्रेक दिले आहे. सुरक्षेसाठी यात ऑफ-रोड ABS आणि कॉर्निंग ABS दिले आहे.
8/ 8
KTM 390 Adventure चे वजन तब्बल 158 किलोग्राम इतके आहे. या बाइकमध्ये 14.5 लीटर क्षमतेची टाकी देण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्याचा प्रवासासाठी उपयुक्त ठरेल.