21 वर्षीय कायराचे (Kyra) इंस्टाग्रामवर 99 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कायराचे बहुतेक फॉलोअर्स पुरुष आहेत आणि तिला देखील अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे ज्याचा सामना बहुतेक महिलांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर करावा लागतो. कायरा प्रत्यक्षात एक स्त्री नाही किंवा ती अस्तित्वातच नाही, हे जाणून न घेता पुरुष तिच्याशी फ्लर्ट करू लागतात.
Top Social India नावाच्या कंपनीने कायरा या व्हर्च्युअल मॉडेलला तयार केलं आहे आणि भारतातील पहिली मेटा इन्फ्लुएंसर म्हणून तिचं वर्णन केलं जात आहे. तिला मेटाव्हर्सच्या (Metaverse) जगासाठी बनवलं गेलं आहे. कायराने तिचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू करताच 3 महिन्यांत तिचे 50 हजार फॉलोअर्स झाले. लवकरच ती एक लाख फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण करणार आहे.
कायराचे फोटो आणि तिचे रील्स लोकांना खूप आवडतात. कधी ती कुठेतरी हिंडताना, कधी नाश्त्याचा करताना किंवा योगा करताना दिसते. तिच्या फॉलोअर्समध्ये असे बरेच लोक आहेत, जे तिला एक वास्तवात असलेली व्यक्ती मानतात. त्यांना हे माहीत नाही की, हे अकाउंट एका कंटेंट तयार करणाऱ्या टीमद्वारे व्यवस्थापित केलं जात आहे.
इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, कायराचे वर्णन ड्रीम चेझर (Dream chaser), मॉडेल (model) आणि ट्रॅव्हलर (traveler) म्हणून करण्यात आलं आहे. हिमांशू गोयल, बिझनेस हेड, टॉप सोशल इंडिया, यांनी डिसेंबर 2021 मध्ये कायराला लाँच केलं आणि तिची अधिकृत जन्मतारीख 28 जानेवारी 2022 आहे. त्यांना तिला मोठ्या प्रमाणावर घेऊन जायचं आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना त्यांनी सांगितलं की, सध्या कायराचं अकाउंट एका टीमद्वारे व्यवस्थापित केलं जात आहे. परंतु, लवकरच कायराला ट्रेंडनुसार स्वतःचा कंटेंट बनवता यावा, यासाठी प्रयत्न केला जाईल. मात्र, कायराच्या प्रोफाईलवर कंपनीचं नाव कुठेही जोडलेलं नाही. तिच्या खात्याला दररोज हजारो लोक जोडले जात आहेत.
कायराला मेटाव्हर्स मॉडेल म्हणून लोकांसमोर आणलं जात आहे. तंत्रज्ञान, जीवनशैली आणि फॅशनच्या क्षेत्रात याचा प्रचार केला जाईल. आभासी प्रभावकांच्या जागतिक समुदायाचा एक भाग होण्यासाठी, कायरा मेटाव्हर्स फॅशन वीकचा एक भाग बनली आहे, जिथे जगातील सर्व मोठे ब्रँड पोहोचले आहेत. (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@kyraonig)BE