

कार खरेदी करत असताना आपण नेहमी किंमत आणि बिल्ड क्वालिटी किती चांगली आहे, याचा विचार करतो. कारण, रस्त्यावर कधी एखादा अपघात झाला तर त्यात तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सुरक्षित राहिले पाहिजे. अशाच दोन लोकप्रिय गाड्या आहे ज्यांच्या भीषण अपघात झाला होता.


मारुती सुझुकीची लोकप्रिय Maruti Suzuki Swift आणि टाटा Tiago चा भीषण अपघात झाला. ही घटना आहे 12 जुलै रोजीची आहे. याबद्दल युट्यूबर निखील राणा याने या अपघाताची संपूर्ण माहिती समोर आणली. (image courtesy: Nikhil Rana)


टाटा Tiago कारमधून एक दोन मुलांसह हे दाम्पत्य घरी येत होतं. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या मारुती सुझुकी Swift ने धडक दिली.


टाटा Tiago कारची वेग हा साधारणपणे 80-85 च्या दरम्यान होता, तर मारुती स्विफ्टचा वेग हा 100 हुन अधिक होता. (image courtesy: Nikhil Rana)


नवी कोरी स्विफ्ट कार ही तरुण मुलं चालवतं होती, त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला, ते पाहून टाटा Tiago च्या चालकाने महामार्गावर डावीकडे कार वळवली. पण तोपर्यंत स्विफ्ट टाटा Tiago वर येऊन आदळली होती. ही धडक इतकी भीषण होती की, टाटा Tiago दोन वेळा विरुद्ध दिशेनं फिरली आणि रस्त्याच्या बाजूला फेकली गेली.


सुदैवाने या अपघातात टाटा Tiago मधील दोन लहान मुलं आणि दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली नाही. पण, मारुती सुझुकी स्विफ्टमधील तरुणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (image courtesy: Nikhil Rana)


पण, या अपघातात Maruti Suzuki Swift चे प्रचंड नुकसान झाले आहे. गाडीचे इंजिन रस्त्याच्या बाजुला फेकले गेले आहे. तर कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.


पण दुसरीकडे टाटा Tiago च्या बाजूला कार धडकल्यानंतरही फार मोठे नुकसान झाले. आश्चर्याची बाब म्हणजे, यात जर एखाद्या अपघातात बाजूने एखादी कार धडकली तर याच समोरील कार चालकाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता असते. पण, टाटा Tiago ची बिल्ड क्वालिटी ही उत्तम असल्यामुळे जीवितहानी टळली.


चांगली गोष्ट म्हणजे, अपघाताच्या वेळी दोन्ही गाड्यांचे एअर बॅग हे उघडले होते. अशा अपघाताच्या वेळी कारमध्ये ग्लास तोडण्यासाठी नक्की हातोडा किंवा ग्लास तोडण्यासाठी अवजड वस्तू नक्की ठेवा.