

वाहन उद्योगावर मंदीचे सावट असतानाही मारुती सुझुकी बाजारात सर्वात लहान आणि स्वस्त एसयुव्ही कार लाँच कऱणार आहे. गेल्याच आठवड्यात कंपनीने या कारचे फोटो प्रसिद्ध केले होते.


मारुती सुझुकीचा ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या कारची Renault Kwid शी थेट स्पर्धा असेल असं म्हटलं जात आहे.


कंपनीने गाडीच्या इंटेरिअरचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. आकाराने लहान असली तरी एसयुव्ही कारसारखीच दिसते. कंपनीने अद्याप कारची किंमत सांगितलेली नाही. तरी ती 4 लाख रुपयांपर्यंत असू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे.


S Presso मारुती सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफ़ॉर्मवर तयार कऱण्यात आलं आहे. ही अपडेटेड क्रॅश टेस्टचे नियम पूर्ण करेल तसेच वजनानेदेखील हलकी असेल.


लहान एसयुव्ही मध्ये बीएस6 इंजिन असेल. याचा वापर सध्या K10 मध्येही होत आहे. ही कार Std, LXi, VXi, VXi+ या चार प्रकारात उपलब्ध असेल.