जेव्हा तुम्ही कार खरेदी करण्यासाठी दुकानात जाता तेव्हा तुम्हाला सेल्समॅन हमखास भेटत असतो. सेल्समॅन तुम्हाला कारची संपूर्ण माहिती देतो आणि कार खरेदी करण्यास मदत करतो. पण, जर तुम्हाला जर सेल्समॅन म्हणून जर कुत्रा कारची माहिती देण्यास समोर आला तर? दचकू नका असा प्रकार खरोखरच घडला आहे. ब्राझिलमधील हुंदईने एका कुत्र्याला आपल्या शोरुममध्ये नोकरी दिली आहे.
आता हा कुत्रा सोशल मीडियावर स्टार झाला आहे. एखादा कुत्रा सेल्समन कसा होऊ शकतो असा प्रश्नच लोकांना पडला आहे. ब्राझिलमधील या डिलरने आपल्या शोरुम बाहेर मोकाट फिरणाऱ्या या कुत्र्याला आपल्या शोरुममध्ये नोकरी दिली आहे. बरं, एवढंच नाहीतर त्याला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आयडी कार्ड सुद्धा दिला आहे. या कुत्र्याचं नाव टक्सन असं आहे. इंस्टाग्राम वर tucson_prime च्या नावाने हा कुत्रा चांगलाच लोकप्रिय आहे. त्याचे तब्बल 41 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. टक्सन हा शोरुम बाहेर ठाण मांडून होता. काही दिवसांनी शोरुमच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांची दोस्ती झाली. त्यामुळे त्याला आता शोरुममध्ये नोकरीच देण्यात आली.
या कुत्र्याचं वय 1 वर्ष इतकं आहे. एका मोकटा कुत्र्याला आपल्या शोरुममध्ये नोकरी दिली म्हणून हुंदईनेही कौतुक केली आहे. खरं पाहता मोकट कुत्र्याचं आयुष्य हे अत्यंत हलाखीचे असते. त्यामुळे त्याला शोरुममध्ये नोकरी आणि राहण्यास जागाही मिळाली. डिलरने कुत्रा पाळावा अशी वागणूक त्याला दिली नाही. उलट त्याला एक कॅबिन, आयकार्ड असं काही दिलं आहे. त्यामुळे टक्सन शोरुमची राखणदारी करतो. एवढंच नाहीतर तो ग्राहकांना कार शोरुममधून बाहेर काढत असताना रस्त्यावर कुणी नाहीना हे भुकूंनही सांगतो.