

भारतातील दिग्गज बाइक निर्माता कंपनी होंडा मोटर्स (Honda Motors) ने रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी दंड थोपाटले आहे. होंडाने आपली क्लासिक क्रुझर H’Ness CB 350 बाइक लाँच केली आहे. ही बाइक थेट रॉयल एनफील्डच्या क्लासिक 350 मॉडेलला टक्कर देईल.


होंडाने आपल्या डीलरशिप्सद्वारे या बाइकची बुकिंग सुद्धा सुरू केली आहे. Honda ने स्टाइलिंग आणि रेट्रो क्रुझर ट्रेंड लक्षात घेऊन H’Ness CB 350 बाजारात आणली आहे. कंपनीने या बाइकची प्री-बुकिंग (Honda H’Ness pre-booking) सुरू केली आहे. 5,000 रुपये टोकन रक्कम देऊन बाइक बूक करता येईल. पुढील महिन्यात ही बाइक होंडाच्या शोरूमवर उपलब्ध होणार आहे.


नवीन CB350 मध्ये DRLs सह नियो-क्लासिक LED हेडलाइट दिले आहे. या बाइकमध्ये टेलिस्कोपिमक सस्पेंशन आणि ब्लॅक कलरमधील अॅलॉय व्हील्स असणार आहे. या बाइकमध्ये सिंगल सीट मॉडेल सुद्धा उपलब्ध आहे.


H’Ness CB350 मध्ये 4-स्ट्रोकर फ्यूल इंजेक्टेड OHC सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 348.36 सीसी, एअर कूल्ड इंजिन आहे. यात 5,500 rpm वर 20.8 PS इतकी पॉवर मिळते. बाइकचे इंजिन हे हाल्फ-डुप्लेक्स क्रॅडल फ्रेमवर माउंट केले आहे. यात पुढे 310mm डिस्क आण मागे 240mm डिस्क ब्रेक दिले आहे.


पहिल्यांदाच क्रुझर बाइक प्रकारात कोणत्या तरी बाइकला सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) फिचर्स दिले आहे. जे मागील टायरच्या ट्रॅक्शनला कंट्रोल करण्यात मदत करतो. सोबतच फ्युल इंजेक्शनद्वारे इंजिनच्या टॉर्कला कंट्रोल करता येते. हे फिचर एका स्विचमुळे बंद आणि सुरू करता येते.


रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी H’Ness CB350 ने ऐकापेक्षा एक फिचर्स दिले आहे. यात स्मार्टफोन वॉइस कंट्रोल सिस्टम दिले आहे. ज्यामुळे तुम्ही बाइक ब्लुटूथद्वारे मोबाइक कनेक्ट करू शकता. यासाठी खास एक अॅपही दिले आहे. त्यामुळे बाइकच्या हॅन्डलवर उजव्या बाजूला फोन कॉल्स, नेव्हिगेशन म्युझिक प्लेबॅक आणि इन्कमिंग मॅसेज पाहू शकता.


नवीन CB350 मध्ये DRLs सह नियो-क्लासिक LED हेडलाइट दिले आहे. या बाइकमध्ये टेलिस्कोपिमक सस्पेंशन आणि ब्लॅक कलरमधील अॅलॉय व्हील्स असणार आहे. या बाइकमध्ये सिंगल सीट मॉडेल सुद्धा उपलब्ध आहे.