नुसता धुरळा, भारतात आली तब्बल 4 कोटींची फरारी, Lamborghini वर पडली भारी!
जगभरात बोलबाला असलेल्या फरारी Ferrari ने आता भारतात आपली F8 Tributo लाँच केली आहे.
|
1/ 11
जगभरात बोलबाला असलेल्या फरारी Ferrari ने आता भारतात आपली F8 Tributo लाँच केली आहे.
2/ 11
या कारची किंमत थोडीथोडकी नाहीतर तब्बल 4 कोटी इतकी आहे.
3/ 11
फरारीने ही कार मागील वर्षी जेनेवा मोटर शोमध्ये Ferrari F8 Tributo सादर केली होती.
4/ 11
Ferrari F8 Tributo मध्ये तब्बल 3.9 लिटर ट्विन टर्बो व्ही 8 इंजिन दिले आहे. या इंजिनमधून तब्बल 730 PS इतकी पॉवर आणि 770 NM चा टॉर्क जनरेट होतो.
5/ 11
फरारीच्या कार या वेगासाठी ओळखल्या जातात. त्यामुळेच Ferrari F8 Tributo ही फक्त 2.9 सेंकदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग गाठते. तर 7.8 सेकंदात 200 किमी प्रतितास इतका वेगावर पोहोचतेय
6/ 11
Ferrari F8 Tributo ही वेगवान कार आहे, त्यामुळे कारची बाहेरील आणि आतील डिझाइनवर विशेष भर दिला आहे.
7/ 11
. फरारीने आधीचे मॉडेल 488 GTB च्या तुलनेत Ferrari F8 Tributo च्या एरोडायनामिक्सवर 10 टक्के जास्त भर देण्यात आला आहे.
8/ 11
फरारी नेहमी रेड आणि ब्लॅक रंगावरच जास्त भर देत आणि संपूर्ण डॅशबोर्ड हा हाताने तयार केलेला असतो.
9/ 11
Ferrari F8 Tributo ची लांबी ही 4611 मिलीमीटर, आणि रुंदी 1979 मिलीमीटर इतकी आहे तर उंची 1206 मिलीमीटर आहे. यात अल्युमिनियम आर्किटेक्चर दिले आहे.
10/ 11
Ferrari F8 Tributo चा मुकाबला आता थेट Lamborghini Huacan 2020 शी होणार आहे. Huacan 2020 मध्ये तब्बल 5204 सीसी इंजिन दिले आहे.
11/ 11
इतक्या ताकदवान इंजिनमध्ये 640 PS पॉवर आणि 600 NM पीक टॉर्क जेनरेट होतो. पण ज परफॉर्मेंसचा विचार केला तर Ferrari F8 Tributo भाव खाऊन जाते.