हवेत अधांतरी लटकत धावते ही ट्रेन, Sky Train चा ट्रायल रन चीनमध्ये सुरू
Sky Train हे डिझाइन 'द सस्पेन्शन रेल्वे' या नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे. म्हणजेच, ही ट्रेन जमिनीवर नव्हे तर हवेत बांधलेल्या रेल्वेमार्गावर लटकून धावते. पाहा PHOTO
हायस्पीड बुलेट ट्रेन बनवण्यासाठी चीनला जगभरात ओळखलं जातं. आता चीनने ऑटोनॉमस 'स्काय ट्रेन' बनवून आणखी एक विक्रम केला आहे. चीनने पहिली ऑटोनॉमस Alt 147 स्काय ट्रेन व Alt 148 तयार केली आहे, जी जमिनीवर नाही तर हवेत चालणार आहे.
2/ 7
स्काय ट्रेन 'सस्पेन्शन रेल्वे' या नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे. म्हणजेच, ही ट्रेन जमिनीवर नव्हे तर हवेत बांधलेल्या रेल्वेमार्गावर लटकून धावेल. एकाच वेळी किमान 200 प्रवासी या स्काय ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात.
3/ 7
ही ट्रेन विशेषत: छोट्या शहरांसाठी बनवली गेली आहे. या ट्रेनचे डिझाइन चिनी लोक खूप पसंत करत आहेत कारण या ट्रेनच्या डब्यांना जायंट पांडाचे स्वरूप देण्यात आले आहे.
4/ 7
ही स्काय ट्रेन तयार करण्यासाठी तब्बल 2.18 अब्ज युआन खर्च करण्यात आले आहे, ही ट्रेन 80 किलोमीटरच्या वेगाने धावेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्काय ट्रेन असूनही, एका वेळी 200 लोकांचा भार ही ट्रेन सांभाळू शकते.
5/ 7
ही स्कायट्रेन बनवणाऱ्या झोंगटांग एअर रेलचे उपमहासंचालक झोंग मिन म्हणाले की, या ट्रेनचे वजन 2.5 टन आहे जे इतर पारंपारिक ट्रेन पेक्षा अर्धा टन कमी आहे.
6/ 7
नवीन स्काय ट्रेनची चाचणी चीनमधील चेंगदू या मोनो रेल ट्रॅकवर करण्यात आली आहे. या दरम्यान या ट्रेनने 80 किलोमीटरचा वेग पकडला होता. ही ट्रेन पूर्णपणे बॅटरीवर ऑपरेट होते.
7/ 7
स्कायट्रेनमध्ये प्रवास करण्याचे भाडंही जास्त नाही. या ट्रेनचं भाडं मेट्रो ट्रेनच्या भाड्याहून थोडं जास्त आहे.