HONDA ची CBR1000RR-R ची बुकिंग सुरू, टॉप स्पीड तब्बल 300 किमी आणि किंमत...
होंडा मोटरसाइकिल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India- HMSI) ने आपल्या 2020 Honda CBR1000RR-R Fireblade आणि Fireblade SP या दमदार बाइकची बुकिंग सुरू केली आहे.
|
1/ 8
होंडा मोटरसाइकिल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India- HMSI) ने आपल्या 2020 Honda CBR1000RR-R Fireblade आणि Fireblade SP या दमदार बाइकची बुकिंग सुरू केली आहे.
2/ 8
या दोन्ही बाइकच्या बुकिंगसाठी तुम्हाला बिगविंग डीलरशिप्सवर जाऊन या बाइकची बुकिंग करता येणार आहे. BigWing कंपनी ही प्रीमियम मोटरसायकलची डीलरशिप आहे.
3/ 8
होंडाने मागील वर्षी 2019 EICMA मोटरसायकल लाँच केली होती. या बाइकमध्ये आतापर्यंतचे सर्वात ताकदवान इंजिन दिले आहे, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ज्यांनी जास्त वेगाचे वेड आहे अशांसाठीही खास बाइक आहे.
4/ 8
2020 CBR1000RR-R चे स्टँडर्ड आणि SP मॉडलमध्ये 1000 सीसीचे 4-सिलिंडर, लिक्विड कूल्ड, 4-स्ट्रोक, 16 व्हॉल्व्ह, DOHC इनलाइन-4 BS6 इंजिन दिले आहे.
5/ 8
या इंजिनमध्ये 14,500 आरपीएमवर 160kw इतकी पॉवर आणि 12,500 आरपीएमवर 113 Nm इतका पीक टॉर्क जेनरेट होतो. या 6-स्पीड ट्रान्समिशन दिले आहे.
6/ 8
2020 CBR1000RR-R STD आणि SP ची लांबी ही 2100 मिलीमीटर तर रूंदी 745 मिलीमीटर इतकी आहे.
7/ 8
या बाइकमध्ये 16.1 लिटर इतकी इंधन क्षमता असलेली टाकी देण्यात आली आहे. 2020 Honda CBR1000RR-R ची किंमतही अंदाजे 17.41 लाख इतकी असणार आहे.