फाईव्ह स्टार हॉटेल काहीच नाही! हे आहे तब्बल 596 कोटींचे प्राईव्हेट जेट, पाहा PHOTOS
जर हजारो किमीचा विमान प्रवास तुम्हाला अगदी आरामात आणि तोही बेडवर झोपून करता आला तर? दचकू नका, आता तसे शक्य आहे. कारण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल असे irbus ACJ 220 लाँच करण्यात आले आहे.
|
1/ 8
जर हजारो किमीचा विमान प्रवास तुम्हाला अगदी आरामात आणि तोही बेडवर झोपून करता आला तर? दचकू नका, आता तसे शक्य आहे. कारण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल असे irbus ACJ 220 लाँच करण्यात आले आहे. (photo courtesy Airbus ACJ 220 )
2/ 8
irbus ACJ 220 हे एक कॉर्पोरेट जेट आहे. युरोपमधील सर्वात मोठी विमान निर्माता कंपनी एअरबसने हे प्राईव्हट जेट बनवले आहे. या विमानात एकापेक्षा एक हायटेक फिचर्स आहे. सोप्याभाषेत सांगायचे झाले तर हे एका हॉटेलपेक्षा कमी नाही.
3/ 8
या विमानात कॉन्फरन्स रूम पासून ते बेडरूम सुद्धा आहे. या विमानात एकूण सहा रुम आहे. यात 78 फूट लांब आणि 11 फूट रूंद असे केबिन बनवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना वाकून चालण्याची गरज नाही.
4/ 8
एवढंच नाहीतर या विमानात एक किंग साईज बेड आणि फूल शॉवर सारख्या सुविधा देण्यात आल्या आहे.
5/ 8
Airbus ACJ 220 जेटमध्ये फक्त 18 जण प्रवास करू शकता.
6/ 8
हे विमान कुठेही न थांबता 10,463.50 किलोमीटर प्रवास करू शकते. जर या विमानाने अमेरिकेतून उड्डाण केले तर थेट लंडनला लँड होईल.
7/ 8
Airbus ACJ 220 कॉर्पोरेट जेट विमान सलग 12 तास प्रवास करू शकतो.
8/ 8
Airbus ACJ 220 कॉर्पोरेट जेटची किंमतही थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 8.1 कोटी डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात याचा विचार केला तर तब्बल 596 कोटी इतकी किंमत आहे.