

इसुझू मोटर्स इंडिया (Isuzu India) ने अखेर भारतीय कर्मिशअल ऑटो इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली आहे. Isuzu India ने D-Max रेग्युलर कॅब आण D-Max s कॅब लाँच केली आहे. इसुझू मोटर्स भारतात कर्मिशअल वाहनांची विक्री वाढवणार आहे. त्या दृष्टीने हे पहिले पाऊल टाकले आहे.


Isuzu India ने या दोन मॉडेल सह 1710 किलोग्राम पेलोड सह D-Max (2020 Isuzu D-Max) सुपर स्ट्रॉग मॉडेल असणार आहे.


इसुझू मोटर्स इंडियाने 2.5-लिटर Isuzu 4JA1 इंजिनसह हे मॉडेल बाजारात आणले आहे. डी-मॅक्स रेग्युलर आणि डी-मॅक्स एस-कॅब स्पलॅश व्हाइट आणि टाइटेनियम सिल्व्हर रंगात उपलब्ध असणार आहे.


या नव्या मॉडेलमध्ये LNT (Lean NOx Trap), DPT (डिझेल पार्टिकुलर डिफ्युझर) आणि P-SCR (पॅसिव्ह सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट रिडक्शन), इलेक्ट्रॉनिक-नियंत्रित एग्जॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टम दिले आहे.


इसुझू मोटर्स इंडियाने आपल्या या दोन्ही गाड्यांना व्हेरियबल जियोमेट्रिक टर्बोचार्जर दिले आहे. आफ्टर ट्रिटमेंट डिव्हाईस सारखे LNT (लिन नोक्स ट्रॅप), DPD (डिझेल पार्टिकुलर डिफ्युझर)आणि P-SCR (पॅसिव्ह सेलेक्टिव्ह कॅटलिस्ट रिडक्शन) देण्यात आले आहे.


इसुझू डी-मॅक्स रेग्युलर कॅब आणि एस-कॅब इलेक्ट्रॉनिक मध्ये EGR (Exhaust Gas Recirculation) सिस्टम दिली आहे. या गाडीमध्ये तुम्ही सिटची जागा कमी जास्त करू शकता.


तसेच सिट बेल्ट्स कमी जास्त करू शकतात. यासह ड्रायव्हरला स्लायडिंग सीट दिले आहे. त्यामुळे सीट मागे पुढे करता येईल.


दोन्ही मॉडेलमध्ये फ्रंट आणि रिअर crumple झोन, क्रॉस-कार फ्रंट बीम, डोर साइड इंस्ट्रूजन, स्टीयरिंग कॉलम आणि ड्राइवट्रेन दिले आहे. यासह या गाड्यांमध्ये ब्रेक ओव्हरसाइड सिस्टम सुद्धा दिली आहे. जे अचानक ब्रेक लागल्यावर पॉवर बंद करून टाकते.


डी मॅक्स सुपरस्ट्राँगची एक्स शोरूम किंमत 8 लाख 39 हजार रूपये असणार आहे. आगामी सण उत्सवाच्या काळात या गाडीवर अनेक ऑफर आणि आकर्षक किंमतींसह विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.