वृषभ (Taurus) : कामाच्या निमित्ताने केलेला एखादा प्रवास तुमच्या चांगल्या भविष्यासाठीची दारं उघडेल. या वेळी काही नव्या अचीव्हमेंट्स साध्य होण्याचीही शक्यता आहे; मात्र नफ्याचा मार्ग संथ राहील. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या ऑफिसच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण भविष्यात त्यांच्या प्रगतीच्या शक्यता खूप आहेत. उपाय : भगवान गणेशाची आराधना/पूजा करा.
सिंह (Leo) : सध्या बिझनेस अॅक्टिव्हिटीजकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण काही प्रकारचा तोटा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांच्या अॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा आणि रेप्युटेशन यांमध्ये वाढ होईल. तुम्हाला काही महत्त्वाचे अधिकार/जबाबदारीही मिळेल. उपाय : अनाथाश्रमात अन्नदान करा.
मीन (Pisces) : पार्टनरशिपशी निगडित कामांमध्ये नफ्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही कामात तुमच्या पार्टनरची मदत घ्या. ती फायद्याची ठरेल. मार्केटिंगशी संबंधित कामं हाताळणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. नोकरीत/कामात काही अडचणी असतील; मात्र त्या समजून घेऊन तुम्ही त्यावरचा उपाय शोधून काढाल. उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.