वृषभ (Taurus) : मशिनरीशी संबंधित कामांमध्ये एखादं काँट्रॅक्ट किंवा ऑर्डर मिळू शकते. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. ट्रेडिंग बिझनेसमध्ये उद्दिष्टपूर्ती होणं हे खूप कष्टाचं वाटेल. अर्थात, तुम्हाला या कष्टांचे उत्तम परिणामही मिळतील. उपाय : श्री गणेशाची पूजा करा.
कन्या (Virgo) : बिझनेस अॅक्टिव्हिटीजमध्ये खूप मोठी सुधारणा होण्याची शक्यता नाही. वैयक्तिक संपर्कांमधून तुमच्यासाठी काही फायद्याची परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असेल तितक्या माणसांशी संपर्क ठेवा. प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाचं डील होण्याची शक्यता आहे. उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.
वृश्चिक (Scorpio) : कोणतंही नवं काम सुरू करण्यासाठी आता योग्य वेळ नाही. त्यामुळे केवळ सध्याच्या परिस्थितीवरच लक्ष केंद्रित करणं श्रेयस्कर. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं योग्य ठरेल. ऑफिसमध्ये बॉस आणि ऑफिसर्सशी असलेले नातेसंबंध चांगले असतील. उपाय : योगासनं, प्राणायाम करा.