मेष (Aries) : आजचा दिवस आव्हानात्मक असेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती दुबळी राहण्याची शक्यता आहे. गरजेच्या खर्चांसाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. शहाणपणाने, विचारपूर्वक खर्च करा. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच गुंतवणूक करा. अन्यथा तोटा होण्याची शक्यता आहे. आज तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. त्या निभावण्याचं आव्हान तुमच्यापुढे असेल. उपाय : श्री लक्ष्मीमातेची पूजा करा.
वृषभ (Taurus) : ऑफिसमधले विरोधक आज तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील; मात्र तुम्ही हळूहळू यशाकडे वाटचाल करू शकाल; मात्र आजचा दिवस नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी अनुकूल नाही. मोठा तोटा होऊ शकतो. उत्पन्नाचे अन्य स्रोत मिळण्याची आशा आहे. तुमच्यासमोर येणारी संधी चुकवू नका. उपाय : गायीला हिरवा चारा खाऊ घाला.
तूळ (Libra) : आज खूप कष्ट करूनही उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल. ऑफिसमध्ये विनाकारण कोणात गुंतून पडू नका. अन्यथा भविष्यात तोटा सहन करावा लागेल. आज तुमचे छुपे शत्रू सक्रिय असतील. सूर्यास्ताच्या वेळी काहीसा दिलासा असेल. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असेल. उपाय : तेलात तयार केलेली इमरती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.