मकर (Capricorn) : आजचा दिवस एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या, गुरूच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठीचा आहे. या व्यक्तीकडून सल्ला घेऊन काम केल्यामुळे बरेच अडथळे दूर होतील. तुमच्या नेहमीच्या वर्तुळातून बाहेर पडून नवीन व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करा. नवीन मित्र तयार करण्याची गरज आहे. उपाय : गरीब व्यक्तीला लाल रंगाचं फळ दान करा.