कर्क (Cancer) : व्यावसायिकांचं सहकार्य कायम राहील. व्यावसायिक प्रस्तावांना सहकार्य मिळेल. नफ्याची टक्केवारी चांगली राहील. प्रलंबित गोष्टींना चालना मिळेल. व्यावसायिक बाबींना गती मिळेल. करिअर, व्यवसाय प्रभावी राहील. आत्मविश्वास वाढेल. मित्रपक्ष चांगलं काम करतील. उपाय : देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करा.
तूळ (Libra) : नोकरी, व्यवसायात सक्रियता राहील. व्यासंग वाढवा. कष्टाच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यावसायिक बाबी चांगल्या राहतील. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा. व्यवसायात व्यवस्थित प्रगती होईल. धूर्त लोकांपासून अंतर ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. उपाय : मुंग्यांना पिठात साखर मिसळून खायला द्या.
मकर (Capricorn) : व्यापारातील आर्थिक व्यवहार सकारात्मक राहतील. ऑफिसमध्ये वेगानं हालचाल होईल. ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे, त्यांना आवश्यक माहिती मिळेल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ द्या, तुम्हाला आर्थिक लाभ होईल. कार्य विस्तारात यश मिळेल. उपाय : श्री गणपतीला दुर्वा अर्पण करा.
कुंभ (Aquarius) : व्यवसायातील प्रगतीमुळे उत्साही राहाल. कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ द्या. ऑफिसमधील पात्रता आणि अनुभवाच्या मदतीनं तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदार लोकांशी भेट होईल. नवीन प्रकल्पाला गती मिळेल. व्यवसायात चांगले परिणाम दिसतील. आर्थिक लाभ ठीक होईल. व्यवस्थित बोलणं फायद्याचं ठरलं. उपाय : भगवान हनुमानासमोर तुपाचा दिवा लावा.