मेष (Aries) : कामाच्या नव्या ठिकाणी जॉइन होण्यासाठी किंवा नव्या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. रूटीन कामांतून पैसे मिळवता येतील. कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमची मानसिकता तयार कराल. बिझनेस पार्टनर किंवा जवळच्या सहकाऱ्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील. उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.