तूळ (Libra) तुम्ही आधी गमावलेली एखादी संधी आता पुन्हा वेगळ्या स्वरूपात मिळू शकते. एखाद्या गरजू सहकाऱ्याला तुमची मदत देऊ करण्याचं तुम्हाला दडपण येण्याची शक्यता आहे. एखादं बराच काळ रखडलेलं काम आज पूर्णत्वाजवळ येण्याची शक्यता आहे. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एखादी सहल काढण्याचं नियोजन होऊ शकतं, असे संकेत ग्रहतारे देत आहेत. LUCKY SIGN - An old photo of yours
वृश्चिक (Scorpio) कोणत्याही प्रकारचं डिझायनिंग ही तुमची आवड असेल तर त्याचा पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे. आज तुम्ही आपल्याच विचारात हरवून जाल. परंतु यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींवर विचार करण्यास मदत होऊ शकते. कोणत्याही गोष्टीचं नियोजन करण्यासाठी आपल्या मनाचं ऐकणं, आपला आंतरिक आवाज काय सांगतो आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. LUCKY SIGN - Red colored headphones
कुंभ (Aquarius) तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती काही कारणास्तव तुमच्यापासून थोडी अलिप्त राहू शकते. आनंद मिळवण्याच्या तुमच्या मोजपट्टीबाबत विचार करण्याची गरज आहे. एखाद्या मित्राला तुमच्याकडून प्रेरणा मिळू शकते. तुम्हाला जे हवं आहे, ते मिळवण्यासाठी धाडसाने कृती करण्याची गरज आहे. LUCKY SIGN - A salt lamp
मीन (Pisces) महत्त्वाची कागदपत्रं, दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमची प्रशंसा करणारी एखादी व्यक्ती आपल्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या बाहेरून मार्गदर्शनाची अपेक्षा करण्याची शक्यता आहे. चांगलं नातं तयार करण्यासाठी ही चांगली वेळ असू शकते. एखादी आश्चर्यकारक घटना, प्रसंग तुम्हाला भावूक करू शकते. LUCKY SIGN - The moon