Shukra Margi 2022 : 29 जानेवारीपासून शुक्राची अशी असेल चाल; या राशींचे नशीब चमकणार
Shukra Margi 2022: आनंद, समृद्धी, सौंदर्य आणि विलासी जीवनाचे प्रतीक असलेला शुक्र ग्रह (Venus) 29 जानेवारीला भ्रमण करत आहे. 29 जानेवारी रोजी दुपारी 02:28 वाजता तो मार्गस्त होईल. त्या दिवशी शुक्र धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. जाणून घेऊया शुक्राच्या प्रवेशामुळे कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे.
|
1/ 6
मिथुन: या राशीच्या लोकांना शुक्राचे हे भ्रमण लाभदायक ठरणार आहे. तुमच्या कीर्तीमध्ये वाढ होईल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते किंवा पगार वाढू शकतो. समस्या सुटतील. (फोटो क्रेडिट: Pixabay)
2/ 6
सिंह: या राशीच्या लोकांसाठी घर, प्लॉट किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. शुक्राचे भ्रमण होत असल्याने गुंतवणूक आणि मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात प्रणय वाढेल. (फोटो क्रेडिट: Pixabay)
3/ 6
कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राची ग्रहस्थिती आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. परीक्षेत यश मिळण्याचे योग आहे. नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील. (फोटो क्रेडिट: Pixabay)
4/ 6
धनु: शुक्राच्या या भ्रमणामुळे धनु राशीच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल, पण थोडी मेहनत करावी लागेल. धनलाभाचे योग आहेत. नातेवाईक किंवा जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. (फोटो क्रेडिट: Pixabay)
5/ 6
मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनाही या काळात फायदा होऊ शकतो. दोघांसाठी आर्थिक लाभाची परिस्थिती असेल. मेष राशीच्या लोकांचे जुने रखडलेले काम होऊ शकते. तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजूही मजबूत होऊ शकते. (फोटो क्रेडिट: Pixabay)
6/ 6
29 जानेवारीलाच बुधाचा पूर्व दिशेला उदय होईल. यामुळे तुम्हाला देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदल पाहायला मिळतात. (फोटो क्रेडिट: Pixabay)