कुंभ- वृश्चिक राशीत तयार होत असलेला हा बुधादित्य योग कुंभ राशीच्या लोकांना लाभ देईल. कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे अष्टलक्ष्मी योगही तयार होत आहे. या योगामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ साधता येईल.
मकर - वृश्चिक राशीत तयार होणारा हा बुधादित्य योग मकर राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरेल. मकर राशीच्या लोकांना या काळात लाभ होईल. नातेवाईक आणि मित्रांशी संबंध दृढ होतील. जर तुमचे काही पैसे कर्जात अडकले असतील तर ते मिळण्याची दाट शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होईल. यासोबतच कार्यालयातील तुमचे अधिकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.