# दिनांक 1: (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1,10,19,28 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या अंगी असलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. पण, जोडीदारासोबत असताना तुम्हाला तुमच्या मूड स्विंगवर ताबा ठेवावा लागेल. शुभ रंग - नारंगी (Orange) शुभ दिन - रविवार शुभ अंक - 3 दान - गरिबांना हळद दान करा.
# दिनांक 2 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2,12, 20, 29 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवशी तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात सर्वकाही सुरळीत असेल. अनेक गोष्टी आश्चर्यकारकपणे तुमच्या बाजूने घडतील. शुभ रंग - निळा (Blue) शुभ दिन - सोमवार शुभ अंक - 2 दान - प्राण्यांना दूध दान करा.
# दिनांक 3 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3,12, 21,30 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भावनिक अस्वस्थतेमुळे जोडीदाराशी भांडण होऊ शकतं. व्यावसायिक निर्णयांमध्ये ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. शुभ रंग - जांभळा (Purple) शुभ दिन - गुरुवार शुभ अंक - 1 दान - मंदिरामध्ये चंदन दान करा.
# दिनांक 4 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4,13, 22, 31तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रवास आणि भविष्याचं नियोजन करणं या दोन गोष्टी आज तुम्ही करू शकता. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर अवलंबून राहताना काळजी घ्या. शुभ रंग - हिरवा (Green) शुभ दिन - मंगळवार शुभ अंक - 9 दान - आश्रमामध्ये रोपं दान करा.
# दिनांक 6 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6,15,24 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही आज दिवसभर गोंधळलेले असाल. ऑफिशियल कमिटमेंट्स किंवा अॅग्रीमेंट्ससाठी आजचा दिवस चांगला आहे. आज धान्य दान करायला विसरू नका. शुभ रंग - आकाशी (Sky Blue) शुभ दिन - शुक्रवार शुभ अंक - 2 दान - गरजूंना आज दूग्धजन्य पदार्थ दान करा.
# दिनांक 7 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करण्यासाठी चांगला दिवस आहे. आज व्यवसायिक यशासाठी संवाद ही तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. शुभ रंग - गर्द जांभळा (Violet) शुभ दिन - सोमवार शुभ अंक - 7 आणि 3 दान - हिरव्या पालेभाज्या दान करा.
# दिनांक 8 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 8,17,26 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज व्यवसायात नफा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. महिलांनी जपून बोलावं, वागावं नकळत कुटुंबातील ज्येष्ठ दुखावले जाण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा शुभ दिन - शुक्रवार शुभ अंक - 6 दान - आज हिरवी फळं दान करा.