क्रमांक 6 आणि क्रमांक 8 असलेली व्यक्ती वचन निभावणारी आणि विश्वासार्ह असते. या व्यक्ती एकमेकांसाठी सर्वोतोपरी आदर्श जोडीदार असतात. या व्यक्ती दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर असतात. तसंच त्यांचा स्वभाव उदार असतो. या गुणांमुळे सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळातील लोकांकडून त्यांना आशीर्वाद मिळतात. धातू, हिरे निर्मितीचा व्यवसाय, संरक्षण सेवांचे व्यवसाय, पायलट, डिझायनर, रेस्टॉरंट्स, ब्रोकर्स, जाहिरात, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात या व्यक्ती चमकदार कामगिरी करतात.
हे क्रमांक असलेली जोडपी एखाद्या वाहनाच्या दोन चाकांसारखी असतात जी आयुष्यभर एकमेकांना साथ देतात आणि एकमेकांशी वचनबद्ध असतात. परंतु, क्रमांक 6 असलेल्या व्यक्तीमुळे काहीवेळा वैवाहिक जीवनात नुकसान होऊ शकतं. शुभ रंग - निळा, शुभ वार - शुक्रवार, शुभांक - 5 आणि 6. या व्यक्तींनी बेघर, भिक्षेकरी, अनाथांना गोड पदार्थ दान करावेत.
क्रमांक 9 : क्रमांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. हा क्रमांक 6 चा शेजारी आहे. त्यामुळे क्रमांक 6 च्या व्यक्तींना क्रमांक 9 असलेल्या व्यक्तींकडून गरजेवेळी मदत मिळते. हे दोन्ही क्रमांक अत्यंत सर्जनशील आणि कलात्मक असतात. क्रमांक 9 आणि क्रमांक 6 असलेल्या व्यक्तींना सर्जनशील कामांमुळे खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळते.
बऱ्याच सामर्थ्यवान लोकांच्या जन्मतारखेची एकूण बेरीज 9 असते. तसेच त्यांच्या वाहनाच्या क्रमांकाची एकूण संख्या 6 असते. क्रमांक 9 आणि क्रमांक 6 असं कॉम्बिनेशन असलेल्या जोडप्यांनी त्यांच्या जीवनशैलीत अविभाज्य घटक म्हणून म्युझिकचा समावेश केला पाहिजे, तसेच मंगळ ग्रहाशी संबंधित नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे. आयुष्यातील सुरुवातीच्या 20 वर्षानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. शुभ रंग - तपकिरी आणि जांभळा, शुभ वार - मंगळवार, शुक्रवार, शुभांक - 9 आणि 6. या अंकांशी संबंधित व्यक्तींनी गहू आणि स्टेशनरी साहित्य आश्रमाला दान द्यावे.