तीनचा प्रभाव असलेल्या व्यक्ती खूप हळव्या आणि इतरांसाठी जास्त विश्वासार्ह असतात. तीनमधील या गुणांमुळे तो क्रमांक सहाशी काहीअंशी संबंधित आहे. या संदर्भात 6 हा 3 ला मागे टाकतो. नाहीतर या दोन अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्ती समान यश मिळवतात. या व्यक्ती उत्कृष्ट वक्ते असतात आणि आपली कौशल्यं कशी प्रदर्शित करावी, याची कला त्यांना माहिती असते. म्हणून ते सन्माननीय सार्वजनिक वक्ते आणि आर्थिक लाभार्थी बनतात.
सहा आणि तीन हे अंक अत्यंत सर्जनशील मानले जातात. त्यामुळे या अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींपैकी काहीजण उत्तम डिझायनर, चित्रकार, गायक, संगीतकार, खेळाडू आणि राजकारणी बनले आहेत. या अंकांचा प्रभाव असलेल्या महिलांवर कुटुंबाचा विश्वास असतो आणि त्या आवडत्या असतात. त्या नेहमी त्यांच्या स्वत:च्या अद्वितीय सर्जनशील मार्गानं कोणत्याही समस्येचं निराकरण करतात. या अंकांचा प्रभाव असलेल्यांनी एकत्रितपणे श्रीकृष्ण आणि राधेची पूजा करावी. सापेक्ष ग्रहांच्या उत्तम परिणामासाठी तुळशीच्या रोपाला खडीसाखर अर्पण केली पाहिजे.
या जन्मांकाच्या व्यक्ती विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीला लाभ देतात आणि त्यांच्यासाठी लकी ठरतात. त्यांनी फक्त उदार वृत्ती ठेवली पाहिजे, बाकी सर्व आपोआप घडतं. अशा व्यक्तींनी महत्त्वाच्या मीटिंगसाठी लाल किंवा केशरी रंगछटांचे कपडे घातले पाहिजेत. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)