#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या मार्गात अडथळे येतील; पण तुम्ही प्रतिकूल परिस्थिती सहज हाताळू शकाल. आत्मविश्वासपूर्ण राहा. आज निर्णय घेण्यासाठी पुरेशी ताकद नसल्यासारखं वाटत असलं, तरी यश मिळवण्यासाठी सूर्यदेवाचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. रोमान्स विसरा आणि आज कामावर लक्ष केंद्रित करा. खेळाडू विजय मिळवून घरी येतील. गॅदरिंगचं यजमानपद भूषवून महिला मनं जिंकतील. कामाच्या ठिकाणी कृत्रिम सूर्यफुलं ठेवावीत. शुभ रंग : Yellow & Orange शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : गरिबांना पिवळ्या मोहरीचं तेल दान करावं.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज अन्य कोणाच्याही प्रभावाखाली न येण्याची काळजी घ्या. अन्यथा तुम्ही कायमस्वरूपी मानसिक अडचणीत याल. मूनलाइटमध्ये व्यतीत करून स्वतःला बरं करण्यासाठी चांगला दिवस. गुंतवणुकीवर सर्वसाधारण परतावा मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टी यांबाबतीत एक पाऊल मागे घेण्याचा प्रयत्न करा. लिक्विड्स, इलेक्ट्रॉनिक्स, धान्यं, ज्वेलरी, केमिकल्स, औषधं, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट आदी क्षेत्रांत व्यवहार करत असलात, तर तुमच्या लाभाच्या दृष्टीने काही घोषणा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : भिकाऱ्यांना दूध दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या सर्कलमधल्या अनुभवी व्यक्तींकडून पर्फेक्ट मार्गदर्शन घ्या. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आज तुमचे सहकारी, बॉस आणि पार्टनरवर पडेल. प्लॅनिंग सहज केलं जाईल. आज डॉक्युमेंट्स आणि ज्वेलरीची काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. सन्मानाची भावना तुमच्या सेलिब्रेशनला चार चाँद लावील. बिझनेस डील्समध्ये केवळ लेखी संवादावरच विश्वास ठेवावा. विद्यार्थ्यांनी आज परीक्षेला जाण्यापूर्वी, तसंच इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यापूर्वी गुरुमंत्राचं पठण करणं आवश्यक आहे. आज पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ तयार करावेत आणि साऱ्या कुटुंबीयांना खाऊ घालावेत. त्यामुळे गुरू ग्रहाचं बळ वाढेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : गरिबांना पिवळ्या डाळी दान कराव्यात.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजची सकाळ घराच्या साफसफाईत व्यतीत करा. मौखिक संवाद साधण्यासाठी आणि माइलस्टोन गाठण्यासाठी पर्फेक्ट दिवस. सरकारी ऑर्डर्स मिळण्यासाठी पैशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. मीटिंग्ज आणि प्रेझेंटेशनमध्ये बराचसा काळ व्यतीत करावा. लीगल केसेस हाताळत असलात, तर अन्य व्यक्तींच्या सल्ल्याबद्दल सावध राहा आणि केवळ स्वतःच्या मनाचं ऐका. पर्सनल रिलेशनशिप्स भावनिक वळण घेतील. संवाद साधत राहा. व्यायामात थोडा वेळ व्यतीत करावा. शुभ रंग : Blue & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : आश्रमात हाउसकीपिंग मटेरियल दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस बऱ्याच हालचालींचा आहे. त्यामुळे घरून काम करणं टाळा. सेल्स क्षेत्रातल्या व्यक्तींना आज चांगले रिझल्ट्स मिळतील. नवं पद, लीडरशिप, डील्स, जागा यांपैकी काही तरी ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे. विरुद्धलिंगी व्यक्तींपासून सावध राहा. कारण त्या तुम्हाला कदाचित भावनिकदृष्ट्या मूर्ख बनवू शकतात. आज इंटरव्ह्यू असेल, तर त्याला आवर्जून जावं. पर्सनल किंवा प्रोफेशनल मीटिंग्जमध्ये हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास उपयुक्त ठरेल. आज पार्टीज आणि नॉन-व्हेज खाणं टाळा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुम्हाला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. खेळांत विजय मिळेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : वृद्धाश्रमात झाडांची रोपं दान करावीत.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) टीममधल्या सहकाऱ्यांकडून दिशाभूल केली जाण्याची किंवा निष्ठेला तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सावध राहा. पार्टनर निवडताना प्रॅक्टिकल आणि स्मार्ट राहा. तुम्हाला कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकारी अशा सगळ्यांचा पाठिंबा लाभला आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र सगळ्यांची जबाबदारी घेणं टाळायला हवं. आजचा दिवस पार्टनरसोबत व्यतीत करण्याचा, तसंच ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन्स देण्याचा आहे. सरकारी टेंडर्समध्ये रिस्क घेण्याइतकं नशीब तुम्हाला अनुकूल आहे. वाहन, मोबाइल, घर घेण्यासाठी किंवा शॉर्ट ट्रिप आयोजित करण्यासाठी चांगला दिवस आहे. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अनुकूल ठरेल. रोमँटिक वातावरणामुळे तुमचा आजचा दिवस बहरेल. शुभ रंग : Aqua & Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : महिलेला बांगड्या दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सौर ऊर्जा, ज्वेलरी, वास्तू, औषधं, सॉफ्टवेअर, अभिनय, राजकारण, अन्नपदार्थ, धातू आदी क्षेत्रांत असलेल्या व्यक्तींना मोठ्या मार्जिनसह नफा मिळेल. आर्थिक व्यवहार करताना शहाणपण बाळगावं आणि लीगल डॉक्युमेंट्सचा फेरआढावा घ्यावा. ज्येष्ठ व्यक्तींसोबत दिवस व्यतीत करावा आणि त्यांचा सल्ला मानावा. बॉसच्या सूचना स्वीकारण्यासाठी तुमचं मन खुलं करा. सॉफ्टवेअर, संरक्षण, सोनं, पेट्रोल, पेयं, कॉस्मेटिक्स आदींशी संबंधित बिझनेस डील्स मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील. लग्नाचे प्रस्ताव स्वीकारण्यासारखे असतील. समृद्धी मिळण्यासाठी भगवान शिवशंकराच्या देवळात जाणं आवश्यक आहे. छोट्या ब्रँड्सशी कोलॅबोरेशन करण्याचा दिवस आहे. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात पिवळं कापड दान करावं.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) स्वतःची प्रतिमा वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ताणाचा आणि दमवणारा दिवस. तुमचं पद आणि पैसा यांच्या क्षमतेचा गैरवापर करू नका. तुम्ही अनेकांचे लीडर आणि मार्गदर्शक असाल; पण लवचिकता हरवणार नाही याची काळजी घ्या. प्रभावी व्यक्ती आणि पैसा यांच्या ताकदीच्या जोरावर लीगल केसेस सोडवल्या जाऊ शकतात. पैशांची समृद्धी वाढवण्यासाठी तुमचा पार्टनर साथ देईल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज मोठं शुल्क भरलं पाहिजे. कारण त्याचा त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी उपयोग होणार आहे. तुमचे सर्व निर्णय एक दिवस होल्डवर ठेवा. खेळाडू कष्टांनी गगनात झेप घेतील. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. आज दानधर्म करणं आवश्यक आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना खाद्यतेल दान करावं.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मंगळ ग्रहाची शक्ती वाढवण्यासाठी मंगळपूजा करा. वृद्धीसाठी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नेटवर्किंगची गरज आहे. अधिकारांचा गैरवापर करू नका. निस्वार्थी राहा. बिझनेस डील्सवर अगदी सहज स्वाक्षऱ्या होतील. सौर ऊर्जा, सरकार, शिक्षण, ग्लॅमर, सॉफ्टवेअर, ऑकल्ट सायन्स, संगीत, मीडिया आदी उद्योगांतल्या व्यक्तींना लोकप्रियता मिळेल. तरुणांना नव्या पदांची ऑफर येईल. आज तुम्ही जे काही कराल, तो निर्णय पर्फेक्ट असेल. आजचा दिवस कोलॅबोरेशन, सार्वजनिक भाषण, इंटरव्ह्यू, स्पर्धा परीक्षा आदींसाठी वापरावा. खेळाडूंच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर्स, सर्जन्सना पुरस्कार मिळतील. ट्रॅव्हल प्लॅन्समध्येही अचीव्हमेंट्स होतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : घरगुती मदतनीसाला लाल कापड दान करा.