#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) स्वयंपाकघरात असणाऱ्या गॅस शेगडीच्या वर भगवान सूर्याची प्रतिमा लावा. आज तुमच्या सर्व कल्पना कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न करा. स्वप्न सत्यात उतरण्याचा काळ असू शकेल. तुमची कौशल्यं सादर करण्यासाठी, तुमच्या आकर्षकतेचा आनंद घेण्यासाठी, समूह किंवा टीमचं नेतृत्व करण्यासाठी इंटरव्ह्यूला उपस्थित राहाल. आज अधिकाधिक जनसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. सर्व जोडप्यांसाठी उत्तम दिवस. सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर लोकप्रियता मिळेल. शुभ रंग : Orange and Green शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार शुभ अंक : 1, 3 दान : लहान मुलांना केशरी पेन दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी एखादी हलणारी शोभेची वस्तू ठेवा. आज कुटुंबीय आणि मित्रांची साथ लाभेल. लहान लहान अडचणी आता नाहीशा होतील. भूतकाळातल्या आठवणींमध्ये जास्त रमणं टाळा. अप्रत्यक्ष संवाद साधा. मुलं आणि नातेवाईकांसोबत व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. कन्सल्टन्सी फर्म्सना आज चांगलं यश मिळेल. शेअर मार्केट गुंतवणूक आणि इम्पोर्ट बिझनेस डील्स करा. रिलेशनशिपमध्ये रोमान्स वाढेल. त्यामुळे समृद्ध व्हाल. अर्थात, त्यासाठी तुम्हाला इतरांच्या प्रभावापासून दूर राहणं गरजेचं आहे. शुभ रंग : Pink शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : आज भिकाऱ्यांना दही दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शक्य असेल तेवढं वाचा. त्यामुळे कलाकारांना संधी वाढतील. या आठवड्यात केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला याच आठवड्यात मिळणार आहे. तुमचं नियोजन कागदावर अंमलबजावणीच्या दृष्टीने तयार ठेवा. अभिनेते, डिझायनर, संगीतकार, लेखक, राजकीय नेते आणि वकील यांच्यासाठी प्रभावशाली दिवस. कपडे किंवा शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस. डॉक्टर, निवेदक, हॉटेल व्यावसायिक, प्रशिक्षक, फायनान्सर आणि डान्सर या व्यक्तींना मोठं यश मिळेल. दिवसाची सुरुवात पिवळा भात खाऊन करा. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : मंदिरात चंदन दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कमी कष्टात अधिक लाभ मिळतील. करिअरमध्ये नवी सुरुवात शक्य आहे. बिझनेस डील्स वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत घेतलेले मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. नाट्य कलाकार, निवेदक आणि डान्सर असणाऱ्या व्यक्तींनी ऑडिशन चुकवू नये. मेटल आणि कापड उत्पादकांना दिवसाच्या शेवटी मोठा फायदा होईल. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : मुलांना रोपं दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आळशीपणा बाजूला ठेवला तर भरपूर फायदा होईल. दीर्घकालीन प्रकरणं सोडवण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यवसायातल्या गुंतवणुकीवर परतावा मिळेल आणि आर्थिक फायदा होईल. जोडीदाराकडून मिळणारं प्रेम आणि आदर या गोष्टींची जाणीव असणं गरजेचं आहे. शेअर मार्केट, स्पोर्ट्स, समारंभ, मुलाखती, स्पर्धा परीक्षा अशा गोष्टींमध्ये नशीब आजमावायला हवं. जोडीदाराचा आज पूर्ण सहवास मिळेल. शुभ रंग : Green and Red शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : पाळीव प्राण्यांना द्रव पदार्थ दान करा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जोडीदाराची चांगली वागणूक तुमचे नातेसंबंध अधिक बळकट करेल. अॅक्सेसरी, फूड, ज्वेलरी, रिटेल, कापड या व्यवसायातल्या व्यक्ती आणि अभिनेत्यांना नवीन संधी आणि लाभ मिळतील. आजचा दिवस अगदी ऐशोआराम आणि आयुष्याला समाधान आणि समृद्धी देणारा आहे. जोडीदारासोबत सुरू असणारे वाद मिटवून एकत्र शॉपिंगला जाण्याचा काळ आहे. डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर, शेफ आणि विद्यार्थ्यांना नवीन काम मिळेल, ज्यामुळे त्यांची प्रगती होईल. रोमँटिक रिलेशनशिपमुळे घरात आनंद पुन्हा येईल. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : घरगुती मदतनीसाला पांढरा रुमाल दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरुवात आईचा आशीर्वाद घेऊन करा आणि सर्व बाबतींत विजय प्राप्त कराल. तुमचे सहकारी आणि जोडीदारावर विश्वासाने एखादी जबाबदारी देऊ शकाल. समोर येणाऱ्या आव्हानाचा स्वीकार करा. कारण हुशारीने सर्वत्र जिंकू शकाल. आई, बहीण किंवा पत्नीने दिलेला सल्ला नक्की स्वीकारा. एखादी अडचण सोडवण्यासाठी वेगळा विचार जादुई ठरेल. बिझनेस किंवा पर्सनल आयुष्यात येणारं एखादं प्रपोझल स्वीकारा. कारण भविष्यात फायदा होईल. वकील, नाट्य कलाकार, सीए, सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या व्यक्ती या सर्वांसाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : तांब्याची एखादी छोटी वस्तू दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) खर्चांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या अंतःप्रेरणेचं ऐका. सरकारी अधिकारी, सेल्स क्षेत्रातल्या व्यक्ती, प्रॉपर्टी बिल्डर, मीडिया आणि टेक कर्मचारी या सर्व व्यक्तींना कंपनीकडून प्रमोशन किंवा कॉम्पेन्सेशन मिळेल. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय अनुकूल ठरतील. कायदेशीर प्रकरणं मिटण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. डॉक्टर आणि उत्पादकांना मोठं यश मिळेल. जोडीदारासोबत प्रत्यक्षात वाद होऊ शकतात. त्यामुळे डोकं थंड ठेवा. आज धान्य दान करणं, आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाणं गरजेचं आहे. शुभ रंग : Deep Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना छत्री दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भविष्यातले लाभ आणि लोकप्रियता या दोन्ही गोष्टी एखाद्या पॅकेजसारख्या मिळतील. पैसा, नशीब, आनंद, स्थैर्य आणि ऐशोआराम या सर्व गोष्टी आज नशीबात आहेत. प्रेमात असलेल्यांनी त्यांच्या भावना लेखी स्वरूपात व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस. बिझनेस रिलेशन्स आणि डील्स नवी उंची गाठतील. ग्लॅमर आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठ्या संधी मिळतील. पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तींनी एकत्रित काम करून प्रगती करणं फायद्याचं ठरेल. प्रशिक्षक, डिझायनर, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि अभिनेत्यांना भरपूर लोकप्रियता मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करा. 18 मार्च रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : निखिल नंदा, शशी कपूर, अलिशा चिनॉय, बब्बू मान, रत्ना पाठक, पृथ्वीराज चव्हाण