#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस नाव आणि प्रसिद्धी कमावण्याचा आहे. सर्व स्पर्धांमध्ये योद्ध्याप्रमाणे विजय मिळवाल. त्यामुळे मजबूत ओळख निर्माण होईल. तुमची सर्जनशील शैली इतरांवर चांगली छाप पाडेल. जोडप्यांमध्ये प्रेमसंबंध चांगले राहतील. सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर लोकप्रियता मिळेल. तुमच्या मतांवर ठाम राहा. कारण तुमचं मत सर्वत्र स्वीकारलं जातं. शुभ रंग : Orange and Green शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार शुभ अंक : 1 आणि 9 दान : डाळिंबं दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं इंट्यूशन सर्वोच्च पातळीवर असेल. त्यामुळे आज तुमच्या हृदयाचं ऐका. सामाजिक कार्याप्रति असलेल्या समर्पणामुळे भरपूर आशीर्वाद आणि सदिच्छा मिळतील. तुम्ही अगदी निरागस असल्यामुळे काही क्षणी लगेच दुखावले जाण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट आणि एक्सपोर्ट व्यवसायातली गुंतवणूक फायद्याची ठरेल. नात्यांमध्ये रोमान्स वाढेल; मात्र आंधळेपणाने विश्वास ठेवणं टाळा. शुभ रंग : Pink शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : मंदिरात चांदीचं नाणं दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) लोकांशी जोडून घ्या किंवा सरकारी विभागांशी उत्तमरीत्या संबंध प्रस्थापित करा. नवीन संधी समोरून चालून येतील. तुमच्या मेहनतीची फळं मिळवण्याचा, त्यातून पैसे मिळवण्याचा हा काळ आहे. तुमचं नियोजन कागदावरून प्रत्यक्षात उतरवा. राजकीय नेते आणि वकील व्यक्तींसाठी प्रभावशाली दिवस. शॉपिंग करणं, प्रवेश घेणं, घर किंवा वाहन खरेदी, आणि कपडे किंवा शोभेच्या वस्तू विकत घेण्यासाठी चांगला दिवस. डिझायनर, हॉटेल व्यावसायिक, निवेदक, प्रशिक्षक, फायनान्सर आणि संगीतकार असणाऱ्या व्यक्तींना आज विशेष यश मिळेल. दिवसाची सुरुवात पिवळा भात खाऊन करा. शुभ रंग : Red and Violet शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : मंदिरात चंदन दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज रागावर नियंत्रण ठेवा. कारण बिझनेसमध्ये नफा आणि यशाचं उत्तम कॉम्बिनेशन आहे. कामं आरामात पार पडण्यासाठी वैयक्तिक ओळखीचा फायदा करून घेण्यासारखा दिवस. बिझनेस व्यवहार उशीर न होता पार पडतील. आर्थिक व्यवहारात घेतलेले मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. नाट्यकलाकार किंवा अभिनेते, निवेदक आणि डान्सर यांनी आज ऑडिशन चुकवू नये. कारण आज लाभ मिळण्याची मोठी संधी आहे. मेटल उत्पादक, बांधकाम व्यावसायिक, वितरक, इन्फ्रास्ट्रक्चर व्यावसायिक, आयटी कर्मचारी, कापड उद्योजक यांना भरपूर आर्थिक फायदा होईल. हिरव्या पालेभाज्यांचा जेवणात समावेश करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लहान मुलांना रोपं दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सगळे जुने मुद्दे सहज सोडवले जातील. तुमच्यामध्ये विविध प्रकारच्या माणसांसोबत काम करण्याचं कौशल्य आहे. त्यामुळे इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक संधी मिळवू शकता. आज गुंतवणूक करण्यात झेप घेण्याची रिस्क घेणं फायद्याचं ठरेल. एखादी दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराकडून मिळणारा आदर लक्षात घेणं गरजेचं आहे. राजकारण, बांधकाम, अभिनय, शेअर मार्केट, एक्सपोर्ट, डिफेन्स, इव्हेंट, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती या गोष्टींमध्ये नशीब आजमावण्यासाठी उत्तम दिवस. तुमचा जोडीदार आज पूर्णपणे तुमचा असेल. शुभ रंग : Green and Orange शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना ब्राउन राइस दान करा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मॅन्युफॅक्चरर्स, स्पोर्ट्स कॅप्टन्स, डिफेन्स ऑफिसर्स, गायक, कमिशन एजंट्स आणि फायनान्सर्सना आज त्यांच्या ग्रहाच्या आशीर्वादांचा पुरेपूर लाभ घेतील. आज भरपूर कामं असतील; मात्र ती आरामात पूर्ण होतील. पार्टनरबरोबरचे वाद सोडवण्याचा आणि बाहेर शॉपिंगला जाण्याचा काळ आहे. डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर, शेफ, विद्यार्थी यांना आपापल्या क्षेत्रातल्या वाढीच्या दृष्टीने नवीन काम मिळेल. रोमँटिक रिलेशनशिपमुळे घरात आनंद परतेल. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : महिला मदतनीसाला कॉस्मेटिक्स दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) गैरसमज टाळण्यासाठी जोडीदाराशी नातेसंबंध पारदर्शक ठेवा. वकील, सीए, डिफेन्स अधिकारी, ट्रॅव्हलर, इंजिनीअर आणि बिझनेसमन यांना समाजात भरपूर मानसन्मान मिळेल. आज सर्व काही सुरळीत पार पडेल. त्यामुळे सहकाऱ्यांवर संशय घेणं टाळा. आज समोर येणारं आव्हान स्वीकारा. त्यावर तुमच्या विश्लेषण कौशल्याच्या आधारे आरामात मात कराल. एखादी व्यक्ती ऑफर करत असलेलं वैयक्तिक किंवा बिझनेस प्रपोझल नक्की स्वीकारा. कारण ते भविष्यात फायद्याचं ठरेल. वकील, नाट्य कलाकार, सीए, सॉफ्टवेअर इंजिनीअर यांच्यासाठी विशेष भाग्याचा दिवस आहे. शुभ रंग : Brown शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : तांबे धातूचा एखादा तुकडा किंवा वस्तू दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरातल्या कामगारांवर आगपाखड करणं टाळा, अन्यथा विपरीत परिणाम होऊ शकतात. परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आज पद आणि पैसा दोन्ही तुम्हाला मिळेल. आर्थिक लाभ मोठे असतील. प्रॉपर्टीसंबंधीचे निर्णय तुमच्या बाजूने होतील. कायदेशीर वाद सोडवण्यासाठी पैशांची गरज भासेल. उत्पादक, आयटी कर्मचारी, सरकारी अधिकारी, ब्रोकर, ज्वेलर्स, डॉक्टर आणि पब्लिक स्पीकर यांना भरपूर यश मिळेल. जोडीदारासोबत वाद संभवतो. त्यामुळे डोकं शांत ठेवा. धान्य दान करणं आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाणं गरजेचं आहे. शुभ रंग : Deep Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना कपडे दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सेल्फ ड्राइव्ह टाळा आणि बाहेरचं खाणंही टाळा. आज आध्यात्मिक समर्पण गरजेचं आहे. तुमच्याकडे पाहून इतरांना प्रेरणा मिळते. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आनंद घ्या. बिझनेस रिलेशन्स किंवा डील्स वेगळ्या उंचीवर पोहोचतील. ग्लॅमर आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. राजकीय व्यक्तींना मोठ्या संधी मिळतील. प्रशिक्षक, बेकर्स, हॉटेल व्यावसायिक, स्टॉक ब्रोकर्स, डिझायनर, डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि अभिनेत्यांना भरपूर लोकप्रियता मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करा. 17 मार्च रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : कल्पना चावला, पुनीत राजकुमार, श्वेता बच्चन-नंदा, साईना नेहवाल, बंगारू लक्ष्मण, राहुल राज