मेष - गुरू मेष राशीत भ्रमण करणार आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळतील. या राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. परिवर्तनामुळे कुंडलीत लग्न भाव तयार होत असल्यानं या राशीच्या लोकांचे लग्न जुळण्याची चांगली शक्यता आहे. मान-सन्मान वाढू शकतो आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठीही हा राशी बदल चांगला मानला जातो.