मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांची राशी मिथुन आहे, बुध आणि गुरूचा संयोग त्यांच्यासाठी शुभ मानला जातो. जे नोकरी करत आहेत, त्यांच्या मेहनतीवर बॉस खूष होतील. करिअरमध्ये प्रगती होईल, या काळात तुम्ही जमीन, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम मानला जातो.
धनु - ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी धनु आहे, त्यांच्यासाठी बुध आणि गुरूचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. हा बदल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या उंचीवर नेऊ शकतो. या काळात तुम्हाला जमीन किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
कुंभ - ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांची राशी कुंभ आहे, त्यांच्यासाठी बुध आणि गुरूचा संयोग शुभ राहील. जे व्यवसायाने शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक मानला जातो. तुमच्या बोलण्यात ताकद येईल, त्यामुळे व्यापारी वर्गाला खूप फायदा होण्याची शक्यता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)