घरात काळ्या रंगाच्या मुंग्या येणं शुभ असतं. काळ्या रंगाच्या मुंग्या म्हणजे सुख आणि समृद्धीचे संकेत असतात. घरात मुंग्या आल्यानंतर त्यांना साखर घातली तर, लाभदायक असतं.
2/ 6
तांदूळ ठेवलेल्या भांड्यामधून मुंग्या यायला लागल्या तर, हादेखील एक शुभ संकेत आहेत. कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होणार असल्याचे संकेत मानले जातात.
3/ 6
काळ्या मुंग्या गोल आकारामध्ये थांबून काही खात असतील तर, हा देखील एक शुभ संकेत आहे. करियर आणि उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होण्याचा शक्यता असते.
4/ 6
लाल रंगाच्या मुंग्यांना अशुभ मानलं जातं. लाल मुंग्या संकट, आर्थिक संकेत देतात. पण, याच मुंग्या त्यांच्या घरांमधून अंडी घेऊन जात असतील तर, ते शुभ मानलं जातं. अशा मुंग्यांना खायला घालावं.
5/ 6
वेगवेगळ्या दिशेमधून मुंग्या येणं वेगवेगळ्या घटनांचा इशारा असू शकतो. उत्तर दिशेकडून मुंग्या येत असतील तर, तो शुभ संकेत आहे. तर, दक्षिण दिशेकडून मुंग्या येताना दिसल्यास आर्थिक लाभाचे संकेत असतात.
6/ 6
. पूर्व दिशेकडून मुंग्या येतांना पाहिल्या तर, शुभ वार्ता कळते पश्चिम दिशेकडून मुंग्या येत असतील प्रवासाचे योग असतात.