हस्तरेषेवरून एखाद्या व्यक्तीचा विवाह योग आणि त्याची स्थिती याचा अंदाज करता येतो. हातावरच्या मॅरेज लाईनवरून वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी जाणून घेता येतात. बऱ्याच जणांना आपला विवाह कधी होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. याशिवाय लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल हेही जाणून घ्यायचं असतं. हातावरच्या सगळ्यात छोट्या बोटाखाली बुधाचा उंचवट्यापर्यंत जाणाऱ्या रेषेला विवाह रेषा म्हटलं जातं. मुद्रा शास्त्रानुसार विवाह रेषा तुटलेली नसावी. उलट कधीक स्पष्ट विवाह रेखा असणं आवश्यक असतं. ज्यांच्या हातावर विवाह रेषा स्पष्ट असते त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम असतं. ज्यांची विवाह रेषा हृदय रेषेच्या जवळ असते त्यांच्या लग्नाचा योग विसाव्या वर्षीच येतो. ज्यांच्या विवाह रेषेच्या सुरवातीच्या टोकावरचं एखादं चिन्ह असेल त्या व्यक्तीची विवाहानंतर फसवणूक होऊ शकते. एखाद्या व्यक्तीची विवाह रेषा सूर्यरेषेजवळ जात असेल तर त्या व्यक्तीचा विवाह समृद्ध कुटुंबामध्ये होतो.