10 Best Beach destinations : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्लॅन करा या समुद्रकिनारची ट्रीप
उन्हाळ्याच्या सुट्टी पडताच फिरायला जाण्याचे वेध लागतात. उन्हाळ्यात सगळ्यांना आवडणारं ठिकाण म्हणजे समुद्रकिनारा. भारतातील तुमच्या खिशाला परवडणारी 10 ठिकाणं तुम्हाला सांगणार आहोत.


परीक्षा संपल्यानंतर फिरायला कुठे जायचं याचं नियोजन केलं जातं. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे ना कुठे फिरायला जाण्याबाबत आपण आग्रही असतो. तुम्ही नियोजन केलं का? नसेल तर आम्ही तुम्हाला फिरण्यासाठी काही खास ठिकाणी सांगणार आहोत.


उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जाणं आणि स्कुबाडायव्हींग किंवा समुद्रातील पाण्यावर कसरती, गेम्स खेळणं, बोटींग करणं याकडे मुलांचा आणि तरुणाईचा ओढा अधिक असतो. भारतातील सुंदर अशा 10 समुद्र किनाऱ्यांना तुम्ही या सुट्टीत नक्की भेट द्या.


वेंगुर्ला- ओल्ड वेंगुर्ला पोर्ट, लाईटहाऊस अस्सल कोकम, मासे आणि कोलंबीवर ताव मारण्याचं उत्तम ठिकाण.


भगवती बंदर सागरीकिनारा रत्नागिरी- रत्निगिरी शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण आहे. बंदरावरून तुम्हाला निसर्गाचा अद्भूत देखावा पाहायला मिळतो.


तारकर्ली-देवबाग बीच- मालवणपासून 7 किलोमीटर लांब असणारा आणि कोकणातील सुंदर समुद्रकिनारा आहे. तुम्हाला इथे निसर्गसौंदर्यानं नटलेला नजारा ही पाहायला मिळतो आणि कोकणातील मेव्यावर मनमुराद ताव मारता येतो. इथे स्कुबा डायविंग, पाण्यावरील खेळाचा आनंद तुम्ही लुटू शकता.


वेळणेश्वर- गुहागर तालुक्यातील हा समुद्रकिनारा आहे. जो एका प्राचिन भिंतीनंतर खूप प्रसिद्ध झाला. वेळणेश्वर समुद्रात एक प्राचिन भिंत सापडल्याची चर्चा होती. या व्यतिरिक्त इथे वेळणेश्वर प्राचिन मंदिरही पाहण्यासारखं आहे.


गोवा- मजोदार बीच हा कोलवा समुद्रकिनाऱ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तुमचा थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी इथे नक्की भेट द्या. गोव्यातील सर्वात अद्भुत तट म्हणून या समुद्रकिनाऱ्याची ओळख आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. मन:शांती किंवा मेडिटेशन करण्यासाठी या बीचला भेट द्यायला हवी.


मेरारी बीच केरळ- केरळमधील अल्लेपी गावाजवळ सुंदर समुद्रकिनारा आहे. छोट्या गावाजवळ असलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर खूप शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी इथे भेट द्यायला हवी


कोवालम बीच केरळ- पर्यटकांसाठी लाईट हाऊसचं खास आकर्षण म्हणून या बीचची ओळख आहे. शांत लाटा आणि विशिष्ट पद्धतीच्या बोटींमधून खास समुद्राची सफर करण्यासाठी या बीचला भेट द्यायला हवी.


कलंगुट समुद्रकिनारा- कमी खर्चात अधिक निसर्ग सौंदर्यानं नटलेला, आकर्षक बीच म्हणून कलंगुट बीचची ओळख आहे. परदेशासोबतच देशभरातील पर्यटकांची इथे मोठी गर्दी असते. म्हापसा शहरापासून 8 किलोमीटरवर हा समुद्रकिनारा आहे.


उल्लाल समुद्रकिनारा कर्नाटकातील मंगलोर गोकर्णसोबतच प्रसिद्ध असणारा समुद्रकिनारा म्हणजे उल्लाल बीच आहे.