Home /News /photo-gallery /

EXCLUSIVE : आपल्यावरील 12 आरोपांचं केलं खंडन; काय म्हणाली रिया पाहा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणाबाबत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea chakraborty) न्यूज 18 ला EXCLUSIVE मुलाखत दिली. तिनं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

  सुशांतच्या आयुष्यावर आणि त्याच्या घरावर माझं कधीच नियंत्रण नव्हतं. त्याला जे वाटायचं ते तो करायचा.  त्याच्या घरी राहायला गेल्यावर ना मी त्याचा स्टाफ बदलला, त्याचे मॅनेजर, कुक आणि बॉडीगार्डही त्याने ठेवले तेच होते.

  सुशांत आपल्या बहिणीकडेही राहायला गेला होता. तो स्वत:च परत आला होता मी त्याला जबरदस्ती बोलावलं नव्हतं.

  8 जून, 2019 रोजी  मी सुशांतचं घर सोडलं नाही. सुशांतनेच मला घर सोडून माझ्या घरी जायला सांगितलं. माझी तब्येतही ठिक नव्हती. मला बरं वाटावं म्हणून त्याने घरी जायला सांगितलं. त्याची बहीण मीतूही येणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. मी त्याची बहीण आल्यावर जाते असं म्हटलं मात्र त्याने ऐकलं नाही, लगेच तिथून मला जायला सांगितलं. मी सुशांतला एकटं सोडलं नाही. त्याची बहीण त्याच्यासह होती.

  महेश भट्ट माझ्या वडिलांसारखे आहेत. सुशांतने मला असं अचानक घर सोडून जायला सांगितल्यावर मी खचले होते. मलाही एन्झायटी आहे. मन मोकळं करण्यासाठी मी महेश भट्ट यांना मेसेज केला होता. 

  सुशांतला कुटुंबाला भेटण्यापासून मी कधीच रोखलं. उलट त्यानेच मला तो त्याच्या वडिलांना पाच वर्ष भेटला नसल्याचं सांगितलं होतं. सुशांतच्या वडिलांनी मला त्याच्या आरोग्याबाबत जाणून घेण्याबाबत मेसेज केला होता. त्यानंतर चार तासांतच सुशांतने त्यांना फोन केला होता. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीलाही आपलं मुंबईला येण्याचं तिकीट बुक करण्यासाठी मेसेज केला होता. सुशांतशी त्यांचं बोलणं झालं होतं तर मग ते माझ्यावर असा आरोप कसा करू शकतात.

  मी स्वत: कधीच ड्रग्ज घेतलं नाही. मी ब्लड टेस्टसाठीही तयार आहे. पण सुशांत मारियुआना घ्यायचा हे त्याचा स्टाफ किंवा त्याच्या जवळचं कुणीही सांगेल. मला भेटायच्या दोन वर्षांआधीपासूनच तो मारियुआना घेत असावा. उलट मी त्याला ते घेण्यापासून थांबवण्याचा आणि सोडवण्याचा प्रत्न केला. त्याची मॅनेजर श्रुती मोदी त्याला यातून बाहेर काढण्याबाबतच चर्चा करायचो.

  मी सुशांतला ड्रग्ज दिलेलं नाही. जया साहसोबतचा संवाद सुशांतने केलेला आहे. सुशांत एन्झायटीच्या थेरेपीबाबत बोलायचा, पण हा संवाद कसला होता, त्याने काही घेतलं असेल तर मला माहिती नाही. मी सुशांतला काहीही दिलेलं नाही. 

  सुशांत पाच डॉक्टरांकडून उपचार घेत होता. मी त्याच्यासह डॉक्टरांकडे जायचे मात्र बाहेर बसायचे. डॉक्टर आणि त्याच्यातील संवाद मला माहिती नाही. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन दयायचे ते आम्ही घरातील स्टाफला देऊन ती औषधं आणायला सांगायचो. सुशांत तसं न विसरता औषध घ्यायचा. मात्र तो घराबाहेर किंवा प्रवासात असताना मी त्याला औषधं घेण्याची आठवण करून द्यायचे. मी सुशांतला कोणती औषधं दिली नव्हती किंवा बंद केली नाहीत. मी सुशांतला औषधांचा ओव्हरडोस दिला नाही. सुशांतने जानेवारी 2020 मध्ये आपली औषधं स्वत:च घेणं बंद केलं होतं.

  सुशांतच्या कुटुंबाने माझ्यावर 15 कोटी लुटल्याचा आरोप लावला. ही छोटी रक्कम नाही की इतक्या तपासानंतरही मिळणार नाही. इतके पैसे असते तर मिळालेच असते. सुशांतने मला किंवा माझ्या कुटुंबाला एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही. आमची एकत्र मालमत्ताही नाही.

  मी सुशांतच्या पैशांचाही कधीच वापर केला नाही किंवा त्याचा वापर करून घेतला नाही. सुशांतने मला कधीच पैसे दिले नाहीत. एक गर्लफ्रेंड म्हणून त्याने मला खूश ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकमेकांना गिफ्ट द्यायचो, एकमेकांवर खर्च करायचो.

  शोविक आपल्या कंपनीत पार्टनर व्हावा ही सुशांतचीच इच्छा होती. त्याने त्याला आपल्या कंपनीचं पार्टनर बनवलं होतं. आम्ही सर्वच त्या कंपनीत 33% पार्टनर होतो. 

  सुशांतच्या हार्ड डाइव्हबाबत मला काहीच माहिती नाही. मी सुशांतचं घर सोडून गेल्यावर त्याच्या घरी त्याची बहीण येणार होती इतकंच मला माहिती होतं. दुसरं कुणी आलं असेल तर मला माहिती नाही. 

  सुशांतने आध्यात्मिक उपचार करणारे मोहन जोशी यांचा फोन नंबर गुगलवरून मिळवला होता. ते दोनदा भेटले होते. त्यांनी सुशांतच्या डोक्यावर फक्त हात ठेवले होते आणि सुशांतला बरं वाटलं होतं. सुशांतवर जादूटोणा केला नाही. दर आठवड्यांनी किंवा दहा दिवसांनी एक डॉक्टर सुशांतच्या तब्येतीची विचारपूस करायला, त्याला भेटायला यायचे.

  अंकिता लोखंडे गेल्या चार वर्षांत सुशांतशी बोलली नाही असं म्हणाली मग वर्षभरापूर्वीच सुशांतने तिला मी छळ करत असल्याचा मेसेज कसा काय केला? अंकिताच्याच फ्लॅटचे पैसे सुशांत भरत होता. मोजकीच रक्कम अंकिताने भरली आहे. उलट ती आता त्याच्याच मित्रासह रिलेशनशिपमध्ये आहे.

  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या