
जपानची ऑटोमोबाइल निर्माता कंपनी Nissan (निसान) ने आपली बहुप्रतीक्षित सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही Nissan Magnite (निसान मॅगनाइट) चे कॉन्सेप्ट मॉडेल 16 जुलैला लाँच केले होते. आता या एसयुव्हीचे प्रोडक्शन मॉडेल 21 तारखेला लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात ही सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरण्याची शक्यता आहे.

निसान मोटर्स (Nissan Motors) च्या बहुप्रतिक्षित सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही मॅग्नाइट (Magnite) जुलै महिन्यात पडदा बाजूला केला होता. निसानची ही एसयूव्ही कॉन्सेप्ट कारचे व्हर्जन आहे. ही एसयूव्ही मार्च 2021 पर्यंत भारतात लाँच होणार आहे. ही गाडी भारतीय बाजापेठेत सर्वात छोटी आणि स्वस्त एसयूव्ही ठरणार आहे.

Magnite एसयूव्हीचा थेट सामना हा टाटा नेक्सॉन (Nexon), मारुती सुझुकी विटारा ब्रेजा (Brezza), फोर्डची इकोस्पार्ट (Ecosport), महिंद्रा एसयूव्ही 300 (XUV 300)आणि हुंदईच्या व्हेन्यू (Venue) शी असणार आहे.

निसान Magnite एसयूव्हीची लांबी 4 मीटर पेक्षा कमी असणार आहे. या गाडीला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. या कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये एलईडी हेडलॅप्स (LED Headlamps) आणि एलईडी डीआरएल (LED DRLs) दिले आहे. तसंच कारमध्ये अलॉय व्हिल देण्यात आले आहे.

निसान Magnite मध्ये 1.0 लिटर, 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन 100hp पॉवर देईल.सोबतच या गाडीत 5 स्पीड मॅन्युअल CVT ट्रांसमिशन देण्यात येणार आहे.

निसान Magnite मध्ये सर्वात स्वस्त असलेल्या मॉडेलमध्ये 71bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क देणारे 1.0 लिटर नॅचुरली-ऐस्परेट पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. मॅग्नाइट CMF-A+ मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे.

निसान Magnite मध्ये 360 डिग्री कॅमेरा देण्यात येणार आहे आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करणाऱ्या यंत्रणेसह 8.0 इंच यूनिट दिले जामार आहे. निसान Magnite ची किंमतही ही 5.25 लाखांपासून सुरू होणार, अशी शक्यता आहे. तर ऑटोमॅटिक व्हर्जनची किंमतही 6 लाखांपासून पुढे राहणार आहे.

निसान Magnite एसयूव्ही ही भारतीय बाजारपेठेत गेमचेंजर ठरणार आहे. 'मेक इन इंडिया आणि मेक फॉर वर्ल्ड' ला प्रोत्साहन देण्यासाठी ही कार तयार कऱण्यात आली, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.