नेवासा येथे रास्ता रोको केल्याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर यांच्यासह 35 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जमावबंदीचा भंग यासह विविध कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवानगी नसताना भाजप नेत्यांनी रास्तारोको आंदोलन केलं
दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव व 10 रुपये अनुदान मिळावे, दूध भुकटीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावे, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खते, बी बियाणे मिळावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीज बील माफ करावी, अशी मागणी करण्यात आली.
'महाविकास आघाडी सरकार हे मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचं सरकार', अशी राज्य सरकारवर टीका करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.