S M L

गोड चिकूचे उपयोग

Sonali Deshpande | Updated On: Mar 27, 2017 04:21 PM IST

गोड चिकूचे उपयोग

[wzslider]

२२ फेब्रुवारी : पालघर आणि घोलवडच्या चिकूंना अवघ्या महाराष्ट्रात मोठी मागणी असते. हे लहानसं दिसणारं फळ चवीला जितकं चांगलं असतं तितकंच ते आरोग्यदायी असतं. त्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन-ए आणि सी, फॉस्फरस आणि आयर्न इ.सारखी पोषक तत्त्व असतात. हे चिकू कोणत्याही सीझनला सहज उपलब्ध होतात. कॅन्सरपासून वाचवण्यासाठी, अँटी-व्हायरल, अँटी बॅक्टेरीअल म्हणून हे चिकू काम करतात. आणि तसंच गर्भधारणेत होणाऱ्या त्रासापासून व ह्रदयरोगापासून दूर ठेवतात. सविस्तरपणे पाहूयात चिकूचे काही गुणधर्म आणि उपयोग-

१. चिकू केसांसाठी खूप चांगले असतात.चिकूच्या बीचं तेल केस नरम, सॉफ्ट आणि सुळसुळीत बनवतं. चिकू खाल्याने केस गळणं आणि तुटणं बंद होतं.

२. चिकूतील व्हिटामिन एमुळे डोळे शार्प होतात. तसंच डोळ्यांचे इतर विकारही कमी होतात.

३. चिकूमुळे त्वचाविकार कमी होतात. त्याने त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य खुलून येतं.

४. चिकू पचनव्यवस्थेला मदत करतो. त्यात मोठ्या प्रमाणावर पाचकतत्व असतात. याच्या सेवनाने गॅस्ट्रीक अँजाईम नियंत्रणात राहतं. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतही चिकू मदत करतात.

५. शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या चिकूमुळे कमी होतात. त्यात अनेक प्रकारचे अँटीआक्साईड असतात , जे फ्री रेडिकल्सची प्रक्रिया रोखतं आणि शरीरावरील डाग आणि सुरकुत्या कमी करतात.

६. यात मोठ्या प्रमाणावर फ्रुक्टोज आणि सुक्रोज असतात. तसंच चिकू एनर्जीचा चांगला स्रोत असतो. ग्लासभर चिकू ज्युस दिवसभरासाठी पुरणारी एनर्जी देतं .

७. बध्दकोष्ठ दूर कमी करण्यात चिकू मदत करतं. त्यातील मोठ्या प्रमाणावर असलेले फायबर पचनप्रक्रिया सुरळीत करतात.

८. चिकू चिरडून खाल्याने किडनी स्टोनवर चांगला प्रभाव पडतो.

९. चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि आयर्नच्या मोठ्या समावेशामुळे ते हाडांसाठी चांगले असतात. त्याने हाडं मजबूत होतात.

१०. अनेक पदार्थांमध्ये फ्लेवरसाठी चिकूचा वापर होतो. त्याच्या अनोख्या चवीमुळे मद्यातही चिकूचा फ्लेवर मिळतो.

११. त्यातील सी व्हिटामिन मनावरचा ताण कमी करतं. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close