एकनाथ खडसेंचा लवकरच फैसला, क्लिन चिट मिळणार ?

एकनाथ खडसेंचा लवकरच फैसला, क्लिन चिट मिळणार ?

खडसेंना याआधीच्या तिन्ही प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात क्लिन चिट मिळते का ?

  • Share this:

06 एप्रिल : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी लवकरच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा निकाल लागणार आहे. या प्रकरणाचा अहवाल सादर केला जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन आपल्या नातेवाईकांना दिल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात एकनाथ खडसे यांची उलटतपासणी घेण्यात आली होती.

महसूल मंत्री असतांना उद्योग खात्याशी निगडीत असलेल्या जमिनीसंदर्भात त्यांनी बैठका कशा घेतल्या याची विचारणा झोटिंग समितीने केली होती.

या चौकशीनंतर आता झोंटिंग समितीला आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. झोटिंग समितीला मुदतवाढ देण्यात सरकारने नकार दिलाय. त्यामुळे झोटिंग समिती आपला अहवाल सादर करणार आहे.  हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती डी.एस. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलीये. त्यामुळे खडसेंना याआधीच्या तिन्ही प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात क्लिन चिट मिळते का ?, यावर खडसेंची घरवापसी ठरणार आहे.

First published: April 6, 2017, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading