टी-शर्ट जाळून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

टी-शर्ट जाळून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

झोमॅटोच्या 150 डिलिव्हरी बॉयनी सामूहिक राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

कोलकाता, 28 जून : घरोघरी जाऊन लोकांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी झोमॅटोचे (Zomato) टी-शर्ट जाळून सामूहिक राजीनामा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनची मुजोरी वाढत असल्याचं दिसतंय. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील (India china standoff ) तणाव निवळण्याचं नाव घेत नाही. त्यातच चीन वेगवेगळ्या खेळी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनच्या निषेधार्थ देशभरात #BoycottChinaproduct ही मोहीमही राबवली जात आहे.

दुसरीकडे चीनच्या लडाखमध्ये सुरू असणाऱ्या कुरापतींच्या निषेधार्थ कोलकाता इथे आपले टी-शर्ट जाळून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनी सामूहिक राजीनामा दिला आहे. झोमॅटोमध्ये चीनची गुंतवणूक आहे त्यामुळे यावर बंदी घालण्यासाठी झोमाटोच्या माध्यमातून लोकांना ऑर्डर देऊ नये असे आवाहन यावेळी कर्मचाऱ्यांनी केलं आहे.

हे वाचा- या चेहऱ्यामागचं नैराश्य कोणाला दिसलंच नाही, 24 वर्षाय तरुणाने केला जीवाशी खेळ

झोमॅटोच्या (Zomato) 150 डिलिव्हरी बॉयनी सामूहिक राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. 2018 मध्ये चिनी कंपनी अलिबाबाशी संबंधित असलेल्या अँट फायनान्शिय कंपनीने झोमॅटोमध्ये 21 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करुन जोमाटोमध्ये 14.7 टक्के समभाग (शेअर्स) खरेदी केले. झोमाटोने नुकताच अँट फायनान्शियलकडून 15 कोटी डॉलर्स जमा केले.

हे वाचा- मुजोर चीनी सैनिक हटायला तयार नाहीत, सीमेवरचा वाद चिघळण्याची चिन्हे

या निदर्शनात सामील झालेल्यांपैकी एकाने सांगितले,"चिनी कंपन्या येथून नफा कमवत आहेत आणि आमच्या सैन्यावर हल्ला करीत आहेत. त्यांना आमची जमीन हडप करायची आहे. आम्ही असं होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. भारत-चीन सीमेवर असलेल्या तणावावर देशभरात वेगवेगळी प्रदर्शन केली जात आहे. 15 जून रोजी भारत-चीन मध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर झालेल्या शांततापूर्ण कराराला चीनने बगल देत डेपसांगमध्ये आपलं सैन्य वाढवलं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 28, 2020, 10:07 AM IST

ताज्या बातम्या